JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 4 कोटी उधळून केल्या तब्बल 40 सर्जरी; मॉडेलसारखं दिसण्याच्या नादात महिलेची आता अशी अवस्था झाली की...

4 कोटी उधळून केल्या तब्बल 40 सर्जरी; मॉडेलसारखं दिसण्याच्या नादात महिलेची आता अशी अवस्था झाली की...

लहानपणापासून या महिलेला फेव्हरेट मॉडेलसारखं दिसण्याची हौस होती. यासाठी तिने वयाच्या 17 व्या वर्षापासूनच वेगवेगळ्या सर्जरी केल्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

साओ पाओला, 12 जुलै : एखाद्याचा फॅन असणं, त्याच्यासारखे कपडे घालणे, त्याच्यासारखं चालणं-बोलणं इतपत ठिक आहे. पण काही फॅन असे असतात ज्यांना हुबेहूब त्या व्यक्तीसारखंच दिसायचं असतं, जिचे ते फॅन असतात. त्यासाठी ते काहीही करण्यासाठी तयार होतात. अशाच एका मॉडेलने आपल्या फेव्हरेट मॉडेलसारखं दिसण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून कित्येक सर्जरी केल्या (Woman plastic surgery to look lik Kim Kardashian). ब्राझीलमधील 29 वर्षांची जेनिफर पँपलोना (Jennifer Pamplona) ब्राझीलमधील एक मॉडेल आहे. अमेरिकन मॉडेल आणि टीव्ही स्टार किम कार्दशियानची (Kim Kardashian) ती डाय हार्ड फॅन आहे. जेनिफरला लहानपणापासूनच किम खूप आवडते. तिच्यासारखं दिसण्याची तिला इतकी हौस होती तिने फक्त आपले कपडेच नाही तर लूकही तिच्यासारखा करण्याचा निर्णय घेतला (Brazilian model looks lik Kim Kardashian). हे वाचा -  Girlfriend ने आपली किडनी देऊन Boyfriend ला वाचवलं; ठिक होताच त्याने तिच्या हृदयावर केला वार न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार रुपये उधळले.  किमसारखं दिसण्यासाठी जेनिफरने 12 वर्षांत तब्बल 40 पेक्षा जास्त सर्जरी केल्या. त्यासाठी तिला 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला.  2010 साली जेव्हा ती 17 वर्षांची होती तेव्हा तिने पहिली सर्जरी केली. त्यानंतर तिला सर्जरी करण्याची हौस आली. तिने बट इम्लांट केलं, फॅट इन्जेक्शन घेतलं, ओठ-गाल-नाक सर्व अवयवांचा आकार बदलून घेतला. तिने इतक्या सर्जरी केल्या की ती हुबेहूब किमसारखी दिसू लागली. पण आता तिला त्याचाच त्रास होतो आहे. लोक तिला किमसारखी दिसत असल्याचंच म्हणू लागले. इन्स्टाग्रामवर तिचे एक दशलक्षपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत पण ते फक्त ती किमसारखी दिसते म्हणून. जे तिला बिलकुल आवडत नव्हतं. आपण आपली ओळख गमावली असं तिला वाटू लागलं.  हे वाचा -  लग्नाआधी Virginity गमावल्यामुळे तरुणींवर आली ही वेळ; डॉक्टरही संतापले! आता तिला आपला जुना चेहरा पुन्हा हवा आहे. इस्तानबुलमध्ये तिने एका डॉक्टराकडून नाक, फॅट रिमुव्हल, चेहरा, गळा अशा सर्व सर्जरी पुन्हा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिला 95 लाख रुपये खर्च करावे लागले. आपला मूळ चेहरा परत मिळवण्यासाठी तिला इन्फेक्शनही झालं. ज्यामुळे तीन दिवस तिच्या चेहऱ्यातून रक्त वाहत होता. आता ती ठिक झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या