JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / बाबो! Boyfriend च्या जीवावर Girlfriend ची ऐश; महिन्याला पगार म्हणून मिळतात तब्बल 82 लाख रुपये

बाबो! Boyfriend च्या जीवावर Girlfriend ची ऐश; महिन्याला पगार म्हणून मिळतात तब्बल 82 लाख रुपये

एकेकाळी एका दुकानात काही हजाराची नोकरी करणारी ही तरुणी बॉयफ्रेंडच्या जीवावर आज लक्झरी लाइफ जगते आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 एप्रिल : आपल्याला पैसावाला, श्रीमंत, बंगल्यात राहणारा, महागड्या गाड्यांमधून फिरवणारा, शॉपिंगसाठी भरपूर पैसे देणारा बॉयफ्रेंड किंवा नवरा हवा असं स्वप्न काही तरुणींचं असतं. एका तरुणीला असाच बॉयफ्रेंड मिळाला ज्यामुळे तिचं आयुष्यच पूर्णपणे बदललं. एकेकाळी एका दुकानात काही हजारांची नोकरी करणाऱ्या या तरुणीला तिचा बॉयफ्रेंडच आता महिन्याला लाखो रुपये पगार देतो आहे. ज्यामुळे ती लक्झरी लाइफ जगते आहे. जॉर्जिना रॉड्रिगेज (Georgina Rodríguez). एक मॉडेल आहे. कित्येक बड्या ब्रँड्सच्या जाहिरातीत ती दिसली. सोशल मीडियावर तिचे बरेच फॉलोअर्स आहेत. आय एम जॉर्जिना या तिच्यावरील डॉक्युेंट्रीत तिच्या आयुष्याशी संबंधित बरंच काही सांगण्यात आलं. द मिररच्या रिपोर्टनुसार एकेकाळी जॉर्जिना स्टोरमध्ये काम करायची. तेव्हा तिचा पगार हजार रुपये होता. आता ती 48 कोटींच्या आलिशान महलात राहते. 55 कोटींच्या जहाजात सफर करते. बुगेटी, फरारी अशा लक्झरी कार आणि प्रायव्हेट जेटमध्ये फिरते. रिपोर्टनुसार, जॉर्जिनाला दर महिन्याला 83 हजार पाऊंड म्हणजे 82 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम तिच्या मुलांची देखभाल आणि इतर खर्चासाठी दिली जाते. ही एक ठराविक रक्कम आहे. याला ब्रिटिश मीडियाने सॅलरी म्हटलं आहे. हे वाचा -  ‘बायको जिन्स-टॉप घालते म्हणून तिला…’, नवऱ्याच्या मागणीवर हायकोर्टाने दिला मोठा निर्णय जॉर्जिनाला अशी लक्झरी लाइफ देणारा तिचा बॉयफ्रेंड म्हणजे प्रसिद्ध फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो. (Cristiano Ronaldo). जो सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. 2016 साली त्यांची पहिली भेट झाली. तेव्हापासून ते एकत्र आहेत. तेव्हा रोनाल्डो स्पॅनिश क्लब रिअल मॅड्रिडसाठी खेळत होता.  काही कालावधीपूर्वी  रोनाल्डोने जॉर्जिनाला दीड कोटींची कार गिफ्ट केल्याचं वृत्तही आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या