JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Weight Gain: वजन वाढवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश; महिनाभरात मिळेल Result

Weight Gain: वजन वाढवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश; महिनाभरात मिळेल Result

Best Foods For Weight Gain: वजन वाढवण्यासाठी कोणता आहार घ्यावा आणि त्यासाठी नेमकं काय करायला हवं?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 17 सप्टेंबर : अनेकदा जेव्हा आपले वजन (Weight) कमी होतं, तेव्हा आपण आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष न देता केवळ आपल्या व्यायामावर भर देतो. कारण आपल्याला वाटते की व्यायाम करून आपण आपले वजन वाढवू शकतो. परंतु तसं होत नाही. त्यासाठी आपल्याला उत्तम पद्धतीने आपल्या आहारात चांगल्या प्रकारच्या अन्नपदार्थांचा (Best Foods For Weight Gain) समावेश करावा लागतो. केवळ सप्‍लीमेंट घेऊन आपण आपले वजन वाढवू शकत नाही, त्यासाठी खानपानाचीही काळजी घ्यावी लागते. कारण फक्त सप्‍लीमेंट घेणे आपल्या हे आपल्या शरिरासाठी धोक्याचे (Naturally Weight Gain) ठरू शकते. त्यामुळे आता वजन वाढवण्यासाठी कोणता आहार घ्यावा आणि त्यासाठी नेमकं काय करायला हवं, यासाठी आपण काही टिप्स जाणून घेऊयात. वजन वाढवण्यासाठी आपल्याला दररोजच्या आहारात हेल्दी डाएट असणे आवश्यक असते. त्यासाठी चने आणि त्याबरोबर खजूराचे दररोज सेवन केले तर त्याचा फायदा होतो. चने आणि खजूराचे सेवन हे दररोज सकाळी उपाशीपोटी करायला हवे. ज्यामुळे आपल्या शरिराचे वजन झपाट्याने वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर अंडी खाणे हे सुद्धा वजन वाढवण्यासाठी उपयोगी ठरू शकते. त्यासाठी दररोज सकाळी किमान दोन अंडी उकडून खायला हवी, त्यामुळे शरिराला प्रोटीन्स मिळतील. दिवसभरात 7000 पावलं चालल्याने मृत्यूचा धोका होतो कमी? संशोधनातून मोठा खुलासा अंड्याबरोबर केळी खाणे हे सुद्धा आरोग्याला प्रचंड फायदेशीर असते. कारण केळीला दुधाबरोबर मिक्स करूनही खाता येते. हा त्याचा दुहेरी फायदा असतो. व्यायाम करणारे आणि आपली शरिरयष्टी चांगली बनवण्यासाठी प्रयत्न करणारे अनेकजण हे केळी आणि दुधाचा समावेश आपल्या आहारात करतात. त्याचबरोबर आपल्याला वजन वाढवणयासाठी बदामही फायद्याचे ठरु शकते. कारण त्यामुळे शरिराला पोषकतत्वे मिळतात. (Disclaimer - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या