JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / बीअर आता कडू लागणार नाही; स्वादिष्ट चवीच्या बीअरसाठी सुरूये संशोधन

बीअर आता कडू लागणार नाही; स्वादिष्ट चवीच्या बीअरसाठी सुरूये संशोधन

बिअरच्या कडू चवीमुळे तुम्हालाही बिअर प्यायला आवडत नाही का? तर आता संशोधक चविष्ट बिअर तयार करण्यावर संशोधन करत आहेत.

जाहिरात

बिअर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 नोव्हेंबर:  बीअरच्या कडू चवीमुळे अनेकांना ती आवडत नाही. त्यामुळे ही चवच बदलण्यासाठी संशोधकांनी प्रयत्न केले आहेत. अप्लाइड अँड एनव्हायर्न्मेंटल बायोलॉजी या जर्नलमध्ये लेउवेन कॅथोलिक युनिव्हर्सिटीच्या याबद्दलच्या रिसर्चबाबत माहिती देण्यात आलीय. बेल्जियन शास्त्रज्ञांनी बीअरची कडू चव बदलून एक वेगळी चव तिला कशी देता येईल याबाबत संशोधन केलं आहे. मद्यनिर्मिती क्षेत्रात यामुळे एक क्रांती घडू शकते. बीअर बनवण्यासाठी पाणी, धान्य आणि इतर सामग्रीबरोबर यीस्ट वापरलं जातं. मोठमोठ्या कंटेनरमध्ये ही बीअर तयार केली जाते. यीस्ट घातल्यावर खूप जास्त प्रमाणात कार्बन डाय ऑक्साइड वायू तयार होतो. यामुळे कंटेनरच्या आत दाब निर्माण होतो. याच गोष्टीमुळे बीअरची चव बदलते; मात्र आता हे होणार नाही. ज्या गोष्टीमुळे बीअरची चव बदलते, ती गोष्ट शास्त्रज्ञांनी शोधली असून, त्यावर उपाय केला जाणार आहे. त्यामुळे बीअरची चव बदलणार नाही. हेही वाचा -  तुम्ही कधी ग्रीन कॉफी प्यायलात? लोकांना वेड लावणाऱ्या या कॉफीचे फायदे वाचून थक्क व्हाल! विविध प्रकारची यीस्ट असणाऱ्या इतर जनुकांचा संशोधकांनी अभ्यास केला. कंटेनरच्या दाबामध्येही स्वाद बदलत नाहीत, अशी कोणती जनुकं आहेत, हे त्यांनी तपासलं. यात केळ्याची चव असणाऱ्या जनुकांवर आम्ही जास्त लक्ष दिलं, कारण अनेक प्रकारच्या बीअर आणि मद्यांमध्ये सुरुवातीला याच पद्धतीचा स्वाद असतो, असं रिसर्च टीमचं नेतृत्व करणाऱ्या जोहान थेवेलीन यांनी सांगितलं. त्यासाठी त्यांना डब्ड MDS3 हे एक सिंगल जनुक सापडलं. यामुळे पदार्थाची चव बदलत नव्हती. त्यामुळे जीन एडिटिंग टेक्नॉलॉजी CRISPT/Cas9 च्या साह्याने त्यात बदल करण्यास सुरुवात केली. त्या जनुकांमधल्या म्युटेशन्समुळे बीअरला सुंदर चव देण्यास मदत झाली, असं संशोधकांचं म्हणणं आहे. या संशोधनामुळे कडू चवीच्या बीअर, तसं इतर काही मद्यांच्या चवीतही बदल करणं शक्य होईल असं शास्त्रज्ञांना वाटतंय. मद्यनिर्मितीच्या व्यवसायात यामुळे क्रांती घडू शकते. काही नवीन उत्पादनंही बाजारात विकायला येऊ शकतात. धान्य सडवून, त्यात पाणी व इतर घटक एकत्र करून त्यापासून बीअर बनते. त्यामुळे तिला कडवट चव येते. आता बेल्जियमच्या शास्त्रज्ञांनी ही कडू चव बदलण्यासाठी संशोधन केलंय. त्यामुळे बीअरला वेगळी चव देणंही शक्य होईल. बीअरच्या कडू चवीमुळे अनेकांना ती फारशी आवडत नाही. आता मात्र बीअरची कडू चव बदलल्यास बीअरचे चाहते वाढू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या