JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मुलांच्या या सवयींमुळे सार्वजनिक ठिकाणी तोंड लपवायची वेळ?, पालकांनी घ्यावी ही काळजी!

मुलांच्या या सवयींमुळे सार्वजनिक ठिकाणी तोंड लपवायची वेळ?, पालकांनी घ्यावी ही काळजी!

मुलांचं संगोपन (Nurture) पालकांसाठी तारेवरची कसरत असते. योग्य वयात मुलांवर चांगले संस्कार होणं गरजेचं असतं. शिक्षण, संस्कारांमुळे मुलांचं व्यक्तिमत्त्व (Personality) उत्तम होतं. घरात असो वा सार्वजनिक ठिकाणी (Public Place) मुलांची वर्तणूक चांगली असणं आवश्यक असतं.

जाहिरात

'या' गोष्टी ठेवा लक्षात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 जुलै : मुलांचं संगोपन (Nurture) पालकांसाठी तारेवरची कसरत असते. योग्य वयात मुलांवर चांगले संस्कार होणं गरजेचं असतं. शिक्षण, संस्कारांमुळे मुलांचं व्यक्तिमत्त्व (Personality) उत्तम होतं. घरात असो वा सार्वजनिक ठिकाणी (Public Place) मुलांची वर्तणूक चांगली असणं आवश्यक असतं. यासाठी मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असताना, त्यांना काही गोष्टी पालकांनी शिकवल्या पाहिजेत. मुलांच्या (Children) वर्तणुकीत सुधारणा होत नसेल तर पालकांनी त्यांच्याशी प्रसंगी कठोर वागलं पाहिजे. कारण मुलांवर लहानपणीच योग्य संस्कार झाले नाहीत, त्यांना चांगल्या गोष्टींची सवय लागली नाही तर भविष्यात पालकांना मुलांमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. सार्वजनिक ठिकाणी मुलांचं वर्तन सौजन्य आणि शिस्तीचं असावं, यासाठी पालकांनी आपल्या मुलांना काही विशेष गोष्टी शिकवणं आवश्यक आहे. लहानपणी शिकलेल्या या गोष्टी मुलांना आयुष्यभर उपयोगी पडतात. बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी मुलांचं वर्तन बेशिस्त (Unruly) असल्याचं आपण पाहतो. त्यामुळे साहजिकच त्यांच्या पालकांना अपमानित व्हावं लागतं. ही वेळ कोणत्याही पालकावर येऊ नये, यासाठी मुलांना योग्य शिकवण देणं, त्यांच्यावर लहानपणीच चांगले संस्कार करणं आणि काही नियमांची जाणीव करून देणं गरजेचं असतं. मुलं लहान असतानाच त्यांना रस्त्यावर चालण्याचे, सुरक्षिततेचे आणि रहदारीचे नियम सांगावेत. लहान असतानाच मुलांना वाहतुकीचे नियम (Traffic Rules) समजले तर ते मोठेपणी या नियमांचं पालन करू शकतील. वाहतुकीच्या नियमांचं पालन का आवश्यक आहे, हे मुलांना आवर्जून सांगावं. याशिवाय मुलांना जेवणाची, चालणं, बसणं आणि झोपण्याची योग्य पद्धत कशी असते, या विषयी माहिती द्यावी. घर स्वच्छ ठेवण्याचं महत्त्व त्यांना पटवून द्यावं. लहान मुलांना चांगल्या सवयींची माहिती देताना, सर्वप्रथम समोरच्या व्यक्तीशी कसं बोलावं हे त्यांना शिकवा. जेणेकरून ते तुमच्यासोबत बाहेर गेल्यावर त्यांच्या बोलण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे तुम्हाला अपमानित व्हावं लागणार नाही. एखाद्या रेस्टॉरंटमध्ये, चित्रपटगृहात किंवा विशेष ठिकाणी गेल्यावर तिथं शांततेची आवश्यकता असेल तर त्याठिकाणी हळूवार कसं बोलावं, हे मुलांना आवर्जून शिकवा. लहान मुलं चंचल (Fickle) असतात. त्यामुळे एखाद्या गोष्टीसाठी ते फार वेळ वाट पाहू शकत नाहीत. तथापि, अगदी सुरुवातीपासूनच मुलांना धीर धरायला शिकवा तसंच योग्य वेळेची वाट पाहण्याविषयी माहिती द्या. प्रतीक्षा करणं किती आवश्यक असतं, ते त्यांना समजवून सांगा. जर तुम्हाला एखाद्याशी काही बोलायचं किंवा विचारायचं असेल, तसंच एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर कधीही घाई करू नका, तुमची पाळी येण्याची वाट पहा, असं पालकांनी लहान मुलांना शिकवलं पाहिजं. यामुळे मुलांमध्ये वयापरत्वे धीर धरण्याची क्षमता आपोआप वाढेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या