वॉशिंग्टन, 05 जुलै : आपण सुंदर (Beautiful) दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटतं आणि यामध्ये तुळतुळीत त्वचेचाही समावेश आहे. पुरुषांप्रमाणे जास्त नाही पण महिलांच्या शरीरावरही (Hair on woman face) थोडेफार केस असतात. मग महिला त्या हेअर रूमुव्हल क्रीम लावून, रेझर वापरून किंवा वॅक्स करून काढून टाकतात. पण काही महिलांना असा आजार बळावतो, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर अगदी पुरुषांसारख्याच दाढी-मिश्या (Beard on woman face) येतात. अमेरिकेतील एका महिलेलाही या समस्येला सामोरं जावं लागतं आहे. पण या महिलेला आपल्या चेहऱ्यावरील दाढी-मिशीची लाज वाटत नाही, तर ती चक्क आपल्या अशा पुरुषी रूपाच्या प्रेमात पडली आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहणारी 35 वर्षांची जीन रॉबिन्सन एक फायनाशिअल एनालिस्ट म्हणून काम करते. तिच्या शरीरात हार्मोन्स अनियंत्रित असल्याने तिला एका विचित्र समस्येचा सामना करावा लागतो आहे. ज्याला तिला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (Polycystic Ovary Syndrome) म्हटलं जातं. यामुळे तिच्या चेहऱ्यावर पुरुषांप्रमाणे दाढी-मिश्या येतात. हे वाचा - अरे हे काय? महिलेचे कान साफ करताना जे सापडलं ते पाहून डॉक्टरही शॉक साहजिकच इतर महिलांप्रमाणे जीनलासुद्धा आपल्या अशा रूपाची सुरुवातीला लाज वाटत होती. आपल्या या समस्येमुळे ती त्रस्त झाली होती. ती दररोज शेव्हींग करायची. सोबत सतत मेकअपचं सामान ठेवायची. पण आता मात्र ती आपल्या खऱ्या रूपासह सर्वांसमोर आली. तिने आपल्या सोशल मीडियावर आपला दाढीसह फोटो, व्हिडीओ शेअर केले. हे वाचा - अडचणीत स्व-सुरक्षेसाठी गरजेचा पेपर स्प्रे; विकत आणण्यापेक्षा असा बनवा घरीच द सन च्या रिपोर्टनुसार जीनने सोशल मीडियावर आपला अनुभव मांडला. त्यानंतर अनेकांनी तिच्या हिमतीला दाद दिली. त्यानंतर अशी समस्या असलेले आपण एकटे नाहीत तर आपल्यासारखे बरेच जण आहेत हेसुद्धा तिला समजलं. तिचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक महिला व्यक्त झाल्या, त्यांनीसुद्धा आपला अनुभव मांडला आणि अशाच महिलांसाठी जीन आता प्रेरणादायी ठरली आहे.