JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Pregnancy मध्ये कोरोनाचा धोका वाढला! 2 दिवसांचा गर्भही कोविड पॉझिटिव्ह

Pregnancy मध्ये कोरोनाचा धोका वाढला! 2 दिवसांचा गर्भही कोविड पॉझिटिव्ह

एका संशोधनामुळे आता कोरोना काळात प्रेग्नन्सी किंवा बेबी प्लॅनिंग करणं किती सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जून :  कोरोनाचा धोका आता लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकालाच आहे, हे दिसून आलं आहे. आई कोरोना पॉझिटिव्ह असल्यास गर्भातील बाळालाही कोरोना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात आता अगदी दोन दिवसांच्या गर्भालाही कोरोना होऊ शकतो, असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनात दिसून आलं आहे. त्यामुळे आता कोरोना काळात प्रेग्नन्सी किंवा बेबी प्लॅनिंग करणं किती सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कोरोना काळात सध्या अनेक जण घरून काम करत आहेत. कपल एकमेकांना वेळ देऊ शकत आहेत. त्यामुळे बहुतेक दाम्पत्य बेबी प्लॅनिंगही करत आहेत. पण कोरोनाचा हा काळ गर्भधारणेसाठी सोपा नाही तर मोठ्या परीक्षेचा आहे, हे संशोधनातून दिसून आलं आहे. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशीही गर्भाला कोरोना होऊ शकतो, ही मोठी माहिती संशोधनात स्पष्ट झाली आहे. हे वाचा -  कोरोना लशीची कमाल! लस घेताच लकवा मारलेल्या शरीरात हालचाल; रुग्णाचा दावा आयसीएमआरची (ICMR) संलग्न संस्था असलेल्या राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेनं (NIRRH) 40 गर्भांचा अभ्यास केला. 2 ते 6 दिवसांच्या गर्भांचा यात समावेश होता. त्यावेळी दोन दिवसांचं गर्भही कोरोनाबाधित असल्याचं दिसून आलं आहे. NIRRH चे वरिष्ठ संशोधक, प्लासेंटा बायोलॉजिस्ट डॉ. दीपक मोदी यांनी सांगितलं, कोविड झालेल्या अनेक मातांचा  आणि अर्भकांचा जगभरात मृत्यू झाला आहे आणि बाळांनाही त्याचा धोका आहेच. त्यामुळे कृत्रिम गर्भधारणा म्हणजेच आयव्हीएफ करत असतानाच एम्ब्रियोचं रोपण केल जावं त्याआधीच्या म्हणजेच प्लास्टोसिसच्या स्वरुपात करू नये. हे वाचा -  आता श्वासासाठी लढावं लागणार नाही! सहजपणे मिळणार कोरोना संजीवनी; 2DG औषध बाजारात आयव्हीएफच्या तंत्रज्ञानाने कृत्रिम गर्भधारणा करणाऱ्या महिलांमध्ये याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहेच पण गर्भवती असलेल्या कोविड मातांनाही याचा धोका आहे. त्यामुळे एखादी महिला कोविडबाधित नसेल पण आयव्हीएफद्वारे गर्भाधारणा झालेलं भ्रूण कोविडबाधित असेल तर मातांमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात याबद्दलचा अभ्यास अजूनही बाकी आहे. त्यामुळे काळजी घेणं हे एकमेव आपण करू शकतो, असं डॉ. मोदी म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या