JOIN US
मराठी बातम्या / भारत-चीन / India-China Tension: चीनच्या मुजोरीमुळे सीमावाद चिघळणार? पॅंगोंग लेक जवळील सैन्य मागे घेण्यास नकार

India-China Tension: चीनच्या मुजोरीमुळे सीमावाद चिघळणार? पॅंगोंग लेक जवळील सैन्य मागे घेण्यास नकार

सोमवारी चिनी सैन्यानं गलवान, गोग्रा आणि हॉट स्प्रिंग परिसरातून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लडाख, 07 जुलै : मे महिन्यापासून भारत आणि चीनमधील वादानंतर चीन सैन्यानं गलवान खौऱ्यातून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र पॅंगोंग लेक जवळील सैन्य मागे घेण्यास चीन तयार नाही आहे. अजूनही चीनचे सैन्य पॅंगोंग लेक जवळील परिसरात तैनात आहे. चीननं या अद्याप सैन्या मागे घेण्याची प्रक्रीय सुरू केली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. चिनी सैन्या सध्या फिंगर 4 परिसरात तैनात आहे. भारतीय सेनाही फिंगर -4 मध्ये आहे, आणि हा परिसर नेहमीच भारताच्या अखत्यारीत राहिला आहे. तर, भारतानं फिंगर -8 वर भारताने LAC असल्याचा दावा केला आहे. या वादावर अद्याप तोडगा निघालेला नाही आहे. सोमवारी चिनी सैन्यानं गलवान, गोग्रा आणि हॉट स्प्रिंग परिसरातून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. वाचा- चीन सीमेवर हवाई दलाचे रात्रीच्या अंधारात खास ऑपरेशन, हेलिकॉप्टर कारवाईचा VIDEO पॅंगोंग गलवान प्रमाणेच चिनी सैन्य डेप्सांग व डेमचॉकवर मागे हटत नाही. याआधी वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC), चीनी सैन्य गलवान खौऱ्यामधील हिंसाचाराच्या ठिकाणापासून सुमारे दीड किमी अंतरावरून मागे हटली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या सैन्यानं स्थानांतरणाबाबत सहमती दर्शविली आहे आणि सैन्याने सद्यस्थितीपासून माघार घेतली आहे. गलवान खौऱ्याजवळ आता एक बफर झोन बनविला गेला आहे, जेणेकरून पुन्हा हिंसाचाराच्या घटना घडू नयेत. वाचा- नरेंद्र मोदी सरकार चीनला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत, घेणार हा मोठा निर्णय गलवान खोऱ्यात शहीद झाले होते 20 जवान मे महिन्यापासून भारत आणि चीनमध्ये तणावाची परिस्थिती आहे. पूर्व लडाख सीमेवर गलवान खोऱ्याजवळील पॅगॉंग तलावावर चिनी सैन्य आणि भारतीय सैन्य समोरासमोर होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही देशांमध्ये चकमक झाली. 15 जून रोजी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे 20 सैनिक शहीद झाले. चीनचेही मोठे नुकसान झाले. चीन सीमेवर हवाई दलाची कारवाई अपाचे हेलिकॉप्टरने भारत-चीन सीमेच्या फॉरवर्ड बेसवर पाळत ठेवण्यासाठी उड्डाण केले. भारतीय वायुसेना सीमेवर सतत सराव करीत असून प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी करत आहे. फक्त अपाचेच नाही तर चिनूक हेलिकॉप्टरनेही येथे सराव केला. याचा व्हिडीओ समोर आला आहे. वाचा- मोदींच्या दौऱ्यानंतर चीन घाबरला! LAC वर 1.5 किमी मागे जाणार चिनी सैन्य संपादन-प्रियांका गावडे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या