JOIN US
मराठी बातम्या / भारत-चीन / Explainer : भारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन

Explainer : भारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन

वाचा भारताची सविस्तर परिस्थिती…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : देशात सध्या चीनविरोधात तणाव सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यापासून सुरू झालेला चीनसोबतचा संघर्ष विविध पातळ्यांवर सुरूच आहे. आधीच अख्खं जग कोरोनासारख्या महासाथीशी सामना करीत आहे. त्यात भारताला चीनबरोबरच पाकिस्तानकडूनही धोका आहे. त्यामुळे सध्या भारताला या दोन्ही देशांकडून युद्धाचा धोका असल्याचे दिसून येत आहे. चिनी सैन्य आता लडाखमध्ये ऑप्टिकल फायबर केबल्सचे जाळे उभे करीत असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून सतत होत असलेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनामुळे पाकिस्तान आणि चीन अशा दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका अधिक तीव्र झाला आहे. या धोक्याने 17 वर्षाच्या उच्चांकाची नोंद गाठली आहे. संसदेच्या मान्सून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, पाकिस्तानी सैन्याने सीमेवर 1 जानेवारी ते 7 सप्टेंबर या कालावधीत 3186 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय सीमेवर या कालावधीत सीमापार गोळीबाराच्या 242 घटना घडल्या असल्याचीही नोंद या अहवालात करण्यात आली आहे. हे ही वाचा- भारतासाठी आनंदाची बातमी! फ्रान्स पुढच्या महिन्यात पाठवणार आणखी 5 राफेल विमानं पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्राच्या लडाखच्या हिमालयीन प्रदेशातील पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्राच्या दक्षिणेकडे आता फायबर केबल्स दिसू लागल्यामुळे चीन आपल्या विस्तार योजनेसह पुढे जात असल्याचे वृत्त मिळाल्याच्या दुसर्‍या दिवशी ही बातमी आली आहे. रॉयटर्स या व्रत्त संस्थेने एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा हवाला देत असे म्हटले आहे की, अशा केबल पुढील तळावरील सेन्यांना संवादाच्या सुरक्षित रेषांसह अलिप्तपणा प्रदान करतात. आणखी एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाल्यापासून दोन्ही बाजूंकडून कोणतीही माघार घेतली गेलेली नाही. हे पूर्वीसारखेच तणावपूर्ण आहे, असेही सदर अधिकाऱ्याने म्हटले आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी एक महिन्यापूर्वी पँगाँग टीएसओ तलावाच्या क्षेत्राच्या उत्तरेस अशाच केबल्स पाहिल्या असल्याचे दुसऱ्या एका सरकारी अधिका-याने याबाबत बोलताना सांगितले आहे. पहिल्या सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, पँगाँग टीएसओ तलावाच्या दक्षिणेस उंच वाळवंटातील वाळूमध्ये उपग्रह प्रतिमांनी नेहमीपेक्षा वेगळ्या रेषा दर्शविल्यानंतर अधिकाऱ्यांना याबाबत सतर्क केले होते. हे ही वाचा- राष्ट्रपती कोविंद, PM मोदी ते CM ठाकरेंपर्यंत 10 हजार भारतीयांवर चीनची नजर या विषयावर चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्यामुळे या संबोधनाला महत्त्व देण्यात येणार आहे. पाकिस्तान सैन्याकडून सतत होत असलेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनामुळे आणि चिनी सैन्याने नुकत्याच केलेल्या हल्ल्यांमुळे भारताला दोन्ही आघाड्यावर युद्धाचा धोका अधिकच तीव्र झाला आहे. बीजिंगने अनेक मुद्दय़ांवर इस्लामाबादचा कडकपणे बचाव केला आहे. तेव्हा चीन आणि त्याचे सर्व मित्र पाकिस्तान आणि भारत याच्याचील सीमा वाद चिगळता ठेवण्यासाठी एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे ही वाचा- ‘भाभा कवच’ देणार सैन्याला सुरक्षा, AK 47 ची गोळीही भेदू शकणार नाही अलीकडेच, चीनने दहशतवादाविरूद्ध लढा देण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नाचे कौतुक करताना म्हटले आहे की, ‘आपल्या सहयोगी देशाने दहशतवाद संपवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत बलिदान दिले आहे’. दरम्यान भारताने म्हटले आहे की ‘पाकीस्तानने हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांचा भूभाग भारत विरोधी दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाता कामा नये’. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये मे महिण्यापासून तणावग्रस्त स्थिती आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सीमेवर असलेल्या एलएसीच्या जवळ दोन्ही बाजूंनी प्रचंड सैन्य वाढवण्यात आले आहे. पुर्व लडाखमधील चार महिन्यांचा लष्करी संघर्ष सोडविण्यासाठी दोन्ही देशांनी पाच-मुद्द्यांवर सहमती दर्शविली आहे. त्यामुळे सैन्याने लवकर विखुरणे; यावर सहमती दर्शवित तणाव वाढविणारी आणि वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) शांतता प्रस्थापित  करण्यासाठी पावले उचलणारी कोणतीही कारवाई टाळावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या