बीजिंग, 09 ऑगस्ट : चीनपाठोपाठ जगभर पसरलेला कोरोनाव्हायरस अद्यापही थैमान घालतो आहे. त्यात मंकीपॉक्सचंही संकट आहे आणि आता आणखी एका खतरनाक व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. ज्या चीनमध्ये सर्वात आधी कोरोनाचा उद्रेक झाला त्याच चीनमध्ये आता नव्या जुनोटिक व्हायरसचा उद्रेक झाला आहे. लँग्या असं या व्हायरसचं नाव आहे. चीनमध्ये लँग्या व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 35 प्रकरणांची नोंद झाली आहे. तैवान सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या माहितानुसार शेडोंग आणि हेनान प्रांतात हे रुग्ण सापडले आहेत. याबाबत लोकांना अलर्ट करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार तैवान सीडीसेचे चुआंग जेन सियांग ताइपे टाइम्सशी बोलताना सांगितलं की, आतापर्यंत दोन टक्के बकरी, 5 टक्के श्वान आणि इतर काही प्राणी या व्हायरसचे पॉझिटिव्ह आहेत. हा व्हायरस प्राण्यांमार्फत माणसांमध्ये पसरण्याची शक्यता जास्त आहे. माणसांमार्फत माणसांमध्ये पसकत असल्याचं अद्याप तरी समोर आलं नाही. आतापर्यंत या व्हायरसमुळे कुणाचाही मृत्यू झाला नाही. हे वाचा - अनेक राज्यांमध्ये डायरियाचा उद्रेक, आजार होऊ नये यासाठी ‘या’ गोष्टी टाळा या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ताप, थकवा, खोकला, भूक कमी लागणं, स्नायूंमध्ये त्रास, डोकेदुखी, उलटी अशी लक्षणं दिसतात. तसंच पांढऱ्या रक्तपेशी कमी होत असल्याचं समोर आलं आहे.