JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Shocking! जन्मापासून तरुणीचं प्रायव्हेट पार्ट गायब; डॉक्टरांनी तिचं आतडं कापून...

Shocking! जन्मापासून तरुणीचं प्रायव्हेट पार्ट गायब; डॉक्टरांनी तिचं आतडं कापून...

जन्मापासूनच तरुणीला जननांग नव्हतं. शेवटी डॉक्टरांनी तिचं आतडं कापून कमाल केली.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 18 नोव्हेंबर :  काही कारणामुळे कुणाला हात नाही, कुणाला पाय नाही अशी प्रकरणं बरीच आहेत. पण कधी कुणाला प्रायव्हेट पार्टच नाही असं तुम्ही ऐकलं आहे का? एक महिला अशाच प्रायव्हेट पार्टशिवाय जन्माला आली. जन्मापासूनच तिला जनानंग नव्हतं. शेवटी डॉक्टरांनी तिचं आतडं कापून कमाल केली. उत्तर प्रदेशमधील हे प्रकरण आहे. हरदोईत राहणारी 20 वर्षांची तरुणी. जिला लहानपाणापासूनच जननांग नव्हते. आतापर्यंत तिला याचं काही वाटलं नाही पण आता तिचं लग्न ठरलं आहे. होणारा नवरा आणि त्याच्या कुटुंबाला तिने आणि तिच्या कुटुंबाने याबाबत काही सांगितलं नाही. यामुळे ते आपला स्वीकार करतील ही नाही, याची भीती त्यांना आहे. लग्न तुटण्याची चिंता त्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे अखेर या समस्येवर उपाय शोधण्यासाठी म्हणून ते डॉक्टरांकडे गेले. हे वाचा -  बाप रे बाप! व्यक्तीच्या पोटातून निघाला चक्क ‘फुटबॉल’; वेदनेकडे दुर्लक्ष करणं पडलं महागात किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमध्ये या महिलेची तपासणी करण्यात आली. तेव्हा ती जन्मापासून महिलाच असल्याचं सिद्ध झालं. पण तिला गर्भाशय आणि इतर जननांग नसल्याचं समोर आलं. तिला मासिक पाळीही येत नव्हती. अखेर तिची सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तिच्या आतड्यांपासून तिचं जननांग तयार केलं. केजीएमयूच्या यूरोलॉजी विभागाचे प्रोफेसर विश्वजीत सिंह यांनी सांगितलं, सुरुवातीला तिच्या आतड्यांचा 10 सेंटिमीटर तुकजा काढण्यात आला आणि त्यापासून तिचं जननांग तयार केलं. याला वैद्यकीय भाषेत सिग्मॉइड वॅजिनोप्लास्टी म्हणतात. या सर्जरीला जवळपास 8 तास लागले. रुग्णालाय डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन महिन्यांत तिच्या सर्जरीचे घावही गायब होतील, असं डॉक्टरांनी सांगितलं. हे वाचा -  बापरे! दातात झालं असं खतरनाक इन्फेक्शन की जीवही गेला; 15 वर्षीय मुलीचा मृत्यू जननांग तर मिळालं पण तरी ही महिला मुलाला जन्म देऊ शकत नाही. ती आपल्या पतीची सर्व इच्छा पूर्ण करू शकते पण मुलाला जन्म नाही देऊ शकत. कारण अशा सर्जरीनंतर मुलाला जन्म देणं खूप कठिण आहे, असं प्रो. विश्वजीत यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या