नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : कोरोना युगानंतर काम करण्याच्या पद्धतीला एक नवीन संस्कृती प्राप्त झाली आहे, ती म्हणजे ‘वर्क फ्रॉम होम’. वर्क फ्रॉम होम म्हणजे ऑफिसचे काम घरी बसून करणे. जरी लोकांना सुरुवातीला काही समस्या होत्या, परंतु आता असे काम करणे जीवनशैलीचा एक भाग बनले आहे. घरातून काम केल्याने वेळ तर वाचतोच, पण त्यामुळे दिनचर्याही सोपी झाली आहे. परंतु काही लोकांना घरातून काम करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या कामाचे कौतुक होत नाही आणि पदोन्नती आदी कामेही बराच काळ रखडली आहेत. तर काही व्यावसायिकांचा असे मत आहे की, घरून काम केल्याने कामाची उत्पादकता कमी होते. याचे ज्योतिषीय कारण असे आहे की, लोक घरातून काम करताना वास्तु नियमांचे पालन करत नाहीत. बेडरूम, बाल्कनी, डायनिंग टेबल, किचन इत्यादी कोणत्याही ठिकाणी लोक लॅपटॉप उघडून काम करू लागतात. काम करण्याची ही पद्धत वास्तुशास्त्रामध्ये चुकीची असल्याचे म्हटले आहे. यामुळे तुमची कार्यक्षमता आणि उत्पादकता दोन्ही कमी होते. दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून जाणून घ्या घरातून काम करताना काम कसे करावे आणि संगणक किंवा लॅपटॉप ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे. संगणक किंवा लॅपटॉप या दिशेला ठेवा - वास्तुशास्त्रात दिशेला विशेष महत्त्व आहे. लहान असो वा मोठ्या कोणत्याही गोष्टीचा लाभ तेव्हाच मिळतो जेव्हा वास्तुशास्त्रानुसार ती योग्य दिशेने ठेवली जाते. तुम्हाला तुमच्या कामाचा परफॉर्मन्स सुधारायचा असेल, तर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपला योग्य दिशेने ठेवणे खूप गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार संगणक आणि लॅपटॉप उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. घरातून काम करताना या गोष्टी लक्षात ठेवा वास्तुशास्त्रानुसार, घरातून काम करताना घराच्या कोणत्याही कोपऱ्यात बसू नका. घरातून काम करण्यासाठी घराचा पश्चिम किंवा नैऋत्य कोपरा सर्वात शुभ आहे. तुम्ही जिथे काम करता ते ठिकाण रोज स्वच्छ करा. तसेच, फुलांनी किंवा कोणत्याही शोपीसने सजवा. हे वाचा - ‘या’आजारामुळे गणितात कमकुवत असतात मुलं, याचं कारण आणि उपचार जाणून घ्या तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणी पुरेसा प्रकाश असावा हे लक्षात ठेवा. जर त्या ठिकाणी अंधार असेल तर तिथे नकारात्मकता राहते, ज्याचा परिणाम तुमच्या कामावर होतो. तुमच्या कामाच्या ठिकाणी सकारात्मकता निर्माण करणाऱ्या गोष्टी असाव्यात. यासाठी तुम्ही उगवत्या सूर्याचे पेंटिंग लावा. काही सकारात्मक रोपे लावली जाऊ शकतात आणि जुन्या किंवा निरुपयोगी गोष्टी टेबलमधून काढून टाकल्या पाहिजेत.
घरातून काम करतानाही तुमच्या कामात एकाग्रता आणि समन्वय राखला गेला पाहिजे. यासाठी तुम्ही घराच्या कोणत्याही भागात काम करत असाल तरी ते कामाच्या ठिकाणाप्रमाणेच व्यावसायिक ठेवण्याचा प्रयत्न करा.