JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / आजी-आजोबांसोबत वेळ घालवणे मुलांसाठी उपयुक्त, जाणून घ्या कसा होतो फायदा

आजी-आजोबांसोबत वेळ घालवणे मुलांसाठी उपयुक्त, जाणून घ्या कसा होतो फायदा

आजच्या युगात, खेळ, अभ्यास आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये व्यग्र असल्यामुळे मुलांना आजी-आजोबांसोबत वेळ घालवायला वेळ मिळत नाही. तर काही मुलांना त्यांच्या आजी-आजोबांना भेटणेही कठीण असते. पण,

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 सप्टेंबर : खरंतर, आजी-आजोबांच्या सहवासात राहणं, त्यांच्याकडून जुन्या गोष्टी ऐकणं हा एक मजेदार अनुभव असतो. मात्र, आजच्या व्यग्र जीवनशैलीत मुलांना आजी-आजोबांसोबत राहण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. पण आजी-आजोबांसोबत राहण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? त्यांच्यासोबत वेळ घालवून तुम्ही तुमचे आयुष्य अधिक समृद्ध करू शकता. आजच्या युगात, खेळ, अभ्यास आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये व्यग्र असल्यामुळे मुलांना आजी-आजोबांसोबत वेळ घालवायला वेळ मिळत नाही. तर काही मुलांना त्यांच्या आजी-आजोबांना भेटणेही कठीण असते. मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आजी-आजोबांसोबत राहणे तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरू शकते. चला तर मग आम्ही तुम्हाला आजी-आजोबांसोबत राहण्याचे काही फायदे सांगतो. आजी-आजोबांसोबत वेळ घालवण्याचे फायदे - मुले सामाजिक बनतात - आजच्या बदलत्या जीवनशैलीत फक्त पालकांसोबत राहणारी मुले सहसा इतर लोकांशी जुळवून घेऊ शकत नाहीत. तर आजी-आजोबांच्या उपस्थितीमुळे मुले केवळ त्यांच्याबरोबर वेळ घालवत नाहीत तर त्यांच्या काही गोष्टींचेही पालन करतात. तसेच, सुट्टीच्या काळात आजी-आजोबांच्या घरी भेट दिल्याने मुलांना कुटुंबातील इतर सदस्यांसोबत मिसळता येते आणि सामाजिक जीवनाचा आनंद मुक्तपणे घेता येतो.

मुलांमध्ये आदराची भावना निर्माण होईल - आजी-आजोबांसोबत राहून मुलं मोठ्यांचा आदर करायला शिकतात. आजी-आजोबा अनेकदा आपल्या मुलांना माफ करून योग्य मार्ग दाखवण्याचे काम करतात. त्यामुळे मुलांची सहनशीलता वाढते. त्याच वेळी, आजी-आजोबांबरोबरच मुले सर्व मोठ्यांकडे आदराने पाहतात आणि त्यांच्या सल्ल्याकडे साफ दुर्लक्ष करत नाहीत. हे वाचा -  तुमच्या हातच्या खाद्यपदार्थांनाही येईल हॉटेलस्टाईल फूडची चव; हे आहे सिम्पल मॅजिक आत्मविश्वासात वाढ - आजी-आजोबांसोबत किंवा संयुक्त कुटुंबात राहिल्याने मुलांचे मनोबल वाढते. अशा परिस्थितीत मुले प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर अडचणींना घाबरण्याऐवजी त्यांचा खंबीरपणे सामना करण्यावर त्यांचा विश्वास वाढतो. याशिवाय आजी-आजोबांसोबत राहिल्याने मुलांमध्ये समर्पण आणि सहकार्याची भावना निर्माण होते.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या