JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / No Bra Day 2022 : असा दिवस ज्या दिवशी महिला घालत नाहीत ब्रा; पण का?

No Bra Day 2022 : असा दिवस ज्या दिवशी महिला घालत नाहीत ब्रा; पण का?

एका गंभीर आजाराबद्दल महिलांमध्ये माहिती होणं खूप आवश्यक आहे. 13 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी नो ब्रा डे म्हणून साजरा केला जातो. जाणून घेऊया काय आहे नो ब्रा डे आणि त्याचा उद्देश.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 ऑक्टोबर : बदलत्या जीवनशैलीसोबत माणसाच्या खाण्यापिण्याच्या सवयी, कपडे परिधान करण्याच्या सवयी यांमध्ये खूप बदल झाला आहे. कपड्यांच्या बाबतीत बोलायला गेलं तर महिलांचे कपडे हाच चर्चेचा विषय असतो. त्यातही ब्रा घालणं, न घालणं, त्याचे परिणाम-दुष्परिणाम असे बरेच चर्चेचे विषय आहेत. पण 13 ऑक्टोबर हा असा दिवस आहे, जो नो ब्रा डे मानला जातो. यादिवशी महिला मुद्दामहून ब्रा घालत नाही आणि हा एक दिवस ब्रा घालू नका, असा सल्ला दिला जातो. पण असं का? नो ब्रा डे म्हणजे शब्दाप्रमाणेच एक दिवस ब्रा न घालणे. या दिवशी ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जनजागृती करण्यात येते. ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांच्या ब्रेस्टशी संबंधित एक आजार आहे. या आजाराबद्दल महिलांमध्ये माहिती होणं खूप आवश्यक आहे. 13 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी नो ब्रा डे म्हणून ब्रेस्ट कॅन्सरबाबत जनजागृती केली जाते.

Breast Cancer Awareness Month 2022 : ही 7 लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टर गाठा; असू शकतो ब्रेस्ट कॅन्सर

याद्वारे लोकांना आठवण करून देण्यास मदत होते की स्तनाचा कर्करोग हा खूप गंभीर आजार आहे, मात्र योग्य वेळी योग्य उपचार घेतल्यास हाच कॅन्सर बरा होण्यासारखा आहे.डेच्या निमित्ताने ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं ओळखण्याबद्दल माहिती पसरवली जाते.

- नो ब्रा डे साजरा करण्याचा मुख्य हेतू केवळ ब्रा न घालणे हाच नाही. तर मुख्य उद्देश कॅन्सर विषयी माहिती पसरवणे आणि त्यापासून वाचण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे हा आहे. - यासाठी तुमच्या डॉक्टरांकडे जा आणि स्तन तपासणीचे एक वेळापत्रक तयार करून घ्या. स्तनाच्या कर्करोगाचे निदान होणे कठीण नाही. जर तुम्ही वेळोवेळी तपासणी करत राहिलात तर तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर झाल्यास त्यावर योग्य उपचार वेळेवर होतील. - ब्रेस्ट कॅन्सरविषयी माहिती करून घ्या आणि तुमच्या मैत्रिणींनाही त्याबद्दल माहिती. शक्य झाल्यास जास्त लोकांपर्यंत या कॅन्सरची माहिती पोहोचावा आणि वेळोवेळी तपासणी करण्याचा सल्ला द्या. - ब्रेस्ट कॅन्सरविषयी माहिती पसरवण्यासाठी तुम्ही इंटरनेट आणि सोशल मीडियाचाही आधार घेऊ शकता. योग्य पद्धतीने योग्य माहिती लोकांना द्या.

Breast Cancer: ब्रा वापरल्याने होतो ब्रेस्ट कॅन्सर? वाचा काय सांगतात तज्ञ

संबंधित बातम्या

- नो ब्रा डेसाठी तुम्ही निधीदेखील गोळा करू शकता. ज्या लोकांना ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे आणि त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत. अशा लोकांना तुम्ही या निधीद्वारे मदत करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या