प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)
भोपाळ, 25 नोव्हेंबर : आपले सिक्स पॅक अॅब्ज असावेत असं कित्येक तरुणांना वाटतं. झटपट बॉडी बनवण्यासाठी बरेच लोक सप्लिमेंट घेतात. अशीच सप्लिमेंट आणि इंजेक्शन घेणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. कारण त्याने जी सप्लिमेंट घेतली ते प्रत्यक्षात सप्लिमेंट नव्हती आणि त्याने जे इंजेक्शन घेतलं तेसुद्धा प्राण्यांना दिलं जाणारं इंजेक्शन होतं. मध्य प्रदेशच्या इंदोरमधील एका तरुणाने लवकरात लवकर सिक्स पॅक अॅब्ज बनवण्यासाठी प्रोटिन पावडर घेणं सुरू केलं. त्यानंतर त्याची तब्येत बिघडू लागली. त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. जय सिंह असं या तरुणाचं नाव आहे. ज्याच्याकडून त्याने सप्लिमेंट्स घेतले होते, त्याचं नाव मोहित पाहुजा असं आहे. त्याच्याविरोधात विजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, त्याला अटक करण्यात आली आहे. हे वाचा - अंगाला सुटली खाज अन् निदान झालं या गंभीर आजाराचं; वेळेत उपचार झाल्याने वाचला महिलेचा जीव आज तकच्या वृत्तानुसार पीडित जय सिंहने पोलिसांना सांगितलं की, जय सिंह म्हणाला, तो आधी विजनगरमध्ये राहायचा. गौरीनगरमध्ये जिममध्ये जायचा. त्यावेळी त्याला मोहित पाहुजाच्या दुकानाबाबत माहिती झाली. तिथं त्याला प्रोटिन पावडरसोबत बाजारात प्रतिबंधित असलेले इंजेक्शनही देण्यात आले. त्याने मोहितकडून मास गेनर प्रोटिन पावडर, इंजेक्शन आणि काही गोळ्या खरेदी केल्या होत्या. त्याच्या सेवनांतर त्याच्या पोटात वेदना होऊ लागल्या, त्याला उलटी होऊ लागली. जयने मोहितला यासाठी बरेच पैसे दिले होते. पण ही औषधं चुकीची होती. चांगल्या प्रोडक्ट्सच्या नावाने त्याने नकली वस्तू दिल्या होत्या, ज्यामुळे त्याची तब्येत बिघडली. असा आरोप जयने केला आहे. हे वाचा - खूर्चीत बसाल तर प्राण गमवाल… जगातील शापित खूर्चीचा इतिहास तुम्हाला माहितीय? पोलीस चौकशीत मोहितने सांगितलं की, तो प्राण्यांना दिले जाणारे इंजेक्शन, औषधांपासून प्रोटिन तयार करत होता. काही रुपयात तयार केलेले हे प्रोटिन तो मोठ्या रकमेला विकत होता.