मराठी बातम्या /बातम्या /Viral /

खूर्चीत बसाल तर प्राण गमवाल... जगातील शापित खूर्चीचा इतिहास तुम्हाला माहितीय?

खूर्चीत बसाल तर प्राण गमवाल... जगातील शापित खूर्चीचा इतिहास तुम्हाला माहितीय?

शापित खूर्ची

शापित खूर्ची

असं म्हटलं जातं की या खूर्चीवर कोणीही बसलं की त्याचा मृत्यू हा अटळ आहे. त्याला कोणीही वाचवू शकत नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई २४ नोव्हेंबर : आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात किंवा बोलल्या जातात, ज्याच्यावर बऱ्याचदा आपण विश्वास ठेवत नाही. लोक बरंच काही बोलताना दिसतात. परंतू सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असे नाही. पण अशा देखील काही गोष्टी असतात किंवा घडतात, ज्या अखेर लोकांना विश्वास ठेवायला भाग पाडतात.

त्यांपैकीच एक आहे ती म्हणजे शापित खूर्ची. असं म्हटलं जातं की या खूर्चीवर कोणीही बसलं की त्याचा मृत्यू हा अटळ आहे. त्याला कोणीही वाचवू शकत नाही.

या खूर्चीशी संबंधीत अशा अनेक कथा समोर आल्या आहेत, ज्यामध्ये खूर्चीने अनेकांचे प्राण घेतल्याचे समोर आले आहे. या कहाणीने अखेर अनेकांना त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडले आहे. सध्या ही खूर्ची म्यूजिअममध्ये ठेवण्यात आली आहे.

हे ही पाहा : ती पडली, सरकली आणि अचानक गायब झाली... रस्ता अपघाताचा 'हा' व्हिडीओ ठरला चर्चेचा विषय

१८व्या शतकात थॉमस बस्बी नावाचा माणूस इंग्लंडमधील थर्स्क येथे राहत होता. त्याचा डॅनियल ऑटी नावाचा पार्टनर होता. हे दोघेही बनावट नाणी बनवण्याचे बेकायदेशीर काम करायचे, असे सांगण्यात येते. डॅनियल हा थॉमसचा चांगला मित्र तर होताच, नंतर थॉमसने डॅनियलची मुलगी एलिझाबेथशीही लग्न केले होते. त्यानंतर दोघेही जावई आणि सासरे झाले.

पुढे ही मैत्री आणखीनच घट्ट होत गेली. रोज काम संपल्यावर दोघे थिरस्क येथील त्यांच्या आवडत्या बारमध्ये एकत्र बसायचे आणि तिथे भरपूर दारु देखील प्यायचे.

शापित खूर्ची

थॉमस त्या बारमध्ये गेला तरी त्याची नेहमीची खुर्ची ठरेली होती. त्यामुळे त्याच्या खूर्चीवर कोणी बसलं तर तो त्यांच्याशी भांडं करायचा. मग बळजबरीने तेथून त्या लोकांना हटवून तो स्वतः त्यात बसायचा. पण हिच खुर्ची पुढे जाऊन अनेकांचे प्राण घेणार होती. याची कोणालाही कल्पना नव्हती.

या कथेची सुरुवात 1702 पासून झाली

एके दिवशी या बारमध्ये थॉमस आणि डॅनियल गेले असता, त्यांचे आपापसात भांडण झाले. हे भांडण इतके वाढले की एकमेकांचे मित्र असलेले दोघेही एकमेकांना मारू देखील लागले. मग डॅनियल थॉमसला चिडवण्यासाठी त्याच्या आवडत्या खुर्चीत बसला. हे पाहून थॉमसला इतका राग आला की त्याने डॅनियलचा खून केला.

पोलिसांनी थॉमसला खुनाच्या आरोपाखाली अटक केली. ज्यानंतर थॉमसला सासऱ्याच्या हत्येच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ज्या दिवशी थॉमसला फाशी दिली जाणार होती. त्या दिवशी त्याला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली.

फाशी देण्यापूर्वी आपली शेवटची इच्छा व्यक्त करताना थॉमसने सांगितले की, त्या बारमध्ये असलेल्या त्याच्या आवडत्या खुर्चीवर बसून त्याला शेवटचे जेवण करायचे आहे.

थॉमसची ही इच्छा मान्य करण्यात आली आणि त्याला त्याच बारमध्ये नेण्यात आले. त्याने आपल्या आवडच्या खूर्चीवर जेवण देखील केले. जेवण संपवून तो उभा राहिला आणि अचानक जोरजोरात ओरडून बोलू लागला ''जो कोणी माझ्या खुर्चीवर बसण्याची हिम्मत करेल तो मरेल''. तेव्हापासून ही खुर्ची खरोखरच शापित ठरली.

शापित खूर्ची

शापित खूर्ची संबंधीत काही कहाण्या

Medium.com च्या मते, दुसऱ्या महायुद्धादरम्यान रॉयल एन्फोर्सर्सचे दोन पायलट त्या पबमध्ये आले आणि त्या खुर्चीवर बसले. त्यानंतर ते दोघे पबमधून बाहेर येताच त्यांच्या कारला अपघात झाला आणि दोन्ही पायलटचा मृत्यू झाला.

यानंतर या खुर्चीवर जो कोणी बसला त्याचा गूढ मृत्यू झाला. या वारंवार होणाऱ्या मृत्यूमुळे पब मालकाला ही खुर्ची पबच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आली. मात्र इथेही या खुर्चीला मिळालेल्या शापाने पाठ सोडली नाही.

एकदा गोदामात सामान ठेवायला आलेला कामगार थकला आणि त्या खुर्चीवर बसला. त्यानंतर तासाभराने त्या कामगाराचा रस्ता अपघातात मृत्यू झाला.

या घटनेनंतर पबच्या मालकाने ही खराब खुर्ची थर्स्कच्या संग्रहालयाला दान केली. तेव्हापासून ही खुर्ची त्या संग्रहालयात ५ फूट उंचीवर ठेवण्यात आली होती. जेणेकरून चुकूनही या खुर्चीवर कोणी बसू नये.

First published:

Tags: Social media, Top trending, Viral, Viral news, Viral photo