JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Walking for Health and Fitness : दररोज चालणं आरोग्यासाठी चांगलं; पण नेमकं किती पावलं चालयाल हवं?

Walking for Health and Fitness : दररोज चालणं आरोग्यासाठी चांगलं; पण नेमकं किती पावलं चालयाल हवं?

किती वेळ किंवा किती पावलं चालणं फायद्याचं असतं याबाबत तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जुलै : चालणं हा सर्वांत उत्तम आणि बिनखर्चाचा व्यायाम आहे. रोज चालणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. त्यानं शारीरिक आणि मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. वजन कमी करणं आणि फिटनेसबरोबरच चालण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे रोज किमान काहीवेळ तरी चालणं आवश्यक आहे. चालणं आरोग्यासाठी चांगलं पण नेमकं किती पावलं चालायला हवं, हे तुम्हाला माहिती आहे का?. पायी चालण्याचे तीन मुख्य फायदे आहेत. एक म्हणजेच आपलं आरोग्य चांगलं राहावं (For Good HHealth) म्हणून, दुसरं म्हणजे वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) आणि तिसरा म्हणजे शरीर बळकट होण्यासाठी म्हणजेच फिजिकल स्ट्रेंथसाठी (Physical Strength ). पण पायी नेमकं किती चालावं याबद्दल अनेकदा गोंधळ होतो. पायी चालण्याचे वजन कमी करण्याशिवायही (Weight Loss) आणखीही फायदे आहेत. पायी चालणं हार्ट आणि लंग्ज म्हणजे (Good For Heart And Lungs) हृदय आणि फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगलं असतं. चालण्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. ब्लडप्रेशर आणि हायपर टेन्शनपासून (BP And Hyper Tension) दूर राहण्यासाठी पायी चालणं हा सर्वोत्तम उपाय आहे. हाय कॉलेस्ट्रटल आणि डायबेटीस नियंत्रणात राखण्यासाठीही चालणं फायदेशीर आहे. तसंच स्नायू आणि जॉईंट्सच्या वेदना चालण्याने कमी होतात. चालण्यानं हाडं बळकट होतात आणि शरीराचं संतुलनही राखलं जातं. पायी चालण्यानं वजन नियंत्रणात राहतं. हे वाचा -  Healthy Drink To Control BP : हाय बीपीवर औषधापेक्षा कमी नाहीत हे ज्युस; पिताच कंट्रोल होईल ब्लड प्रेशर हे तर झाले पायी चालण्याचे फायदे. आता बघूया किती पायी चाललं पाहिजे. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यातील हेल्थ एजन्सीच्या मते, पायी चालण्यासाठी आपल्याला कमीत कमी 30 मिनिटं तरी काढणं गरजेचं (30 minutes’ Walk) आहे. जर तुम्हा इतका वेळ काढणं शक्य नसेल तर जितका वेळ तुम्हाला काढता येईल तितका काढा. पण रोज काही मिनिटं तरी पायी चाला. अर्थात यापेक्षा जास्त वेळ चालता येणं शक्य असेल तर ती खूपच चांगली गोष्ट आहे. तुमचे कुटुंबीय, मित्र, नातेवाईक किंवा शेजाऱ्यांबरोबर चालत जा म्हणजे ही सवय आपोआपच लागेल. काही आरोग्य एजन्सी 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालण्याचाही सल्ला देतात. अमेरिकन आरोग्य एजन्सी सीडीसी (CDC)नं सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीला दररोज 10 हजार पावलं चालण्याचा सल्ला दिला आहे. CDC च्या म्हणण्यानुसार ही 10 हजार पावलं म्हणजे 5 मैल किंवा 8 किलोमीटर एवढं अंतर होतं. रोज इतकं जरी चाललं तरी त्याचा खूप फायदा होईल. अर्थात अमेरिकेत साधारणपणे लोक दीड ते दोन मैल पायी चालतात. मेडिकल न्यूज टुडेनुसार साधारणपणे 5000 पावलं दररोज चालण्याचा सल्ला तज्ञ देतात. हे अंतर जवळपास 4 किलोमीटर एवढं होतं. हे वाचा -  हार्ट अटॅक टाळण्यासाठी सर्वांनीच करायला हवेत हे 6 उपाय; ‘गुड कोलेस्‍ट्रॉल’ असं करा बूस्‍ट टीव्ही 9 हिंदी च्या रिपोर्टनुसार दिल्लीतही डॉक्टर्स दररोज 30 ते 40 मिनिटं पायी चालण्याचा सल्ला देतात. रोजच्या सवयीत पायी चालणं ही सवय लावून घेणं महत्त्वाचं आहे, असं काही डॉक्टरांनीही सांगितलं. पायी चालण्यानं शरीरातील रक्तप्रवाह (Blood Circulation) चांगलं होतं. एकाच वेळेस पूर्ण 4 किलोमीटर पायी चाललं पाहिजे असं गरजेचं नाही. दिवसभरात म्हणजे सकाळी, संध्याकाळी किंवा रात्रीही तुम्हाला जसं जमेल तसं चाला. आजकाल स्मार्टफोनमध्ये स्टेप ट्रॅकर app असतंच. त्यामुळे तुम्ही रोज किती चालता त्याच्या स्टेप्स मोजल्या जातात. हा हिशेब तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो. तेव्हा आता वाट कशाला बघता. हा सर्वोत्तम आणि सहजसोपा व्यायाम आजपासूनच सुरु करा. तज्ज्ञांनी दिलेल्या वेळांपैकी जितका वेळ शक्य आहे, तितका वेळ तुम्ही चालण्याचा प्रयत्न कराल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या