JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / घरगुती उपाय करा आणि सर्दी खोकला पळवून लावा, त्यासाठी करा फक्त 'याचा' वापर!

घरगुती उपाय करा आणि सर्दी खोकला पळवून लावा, त्यासाठी करा फक्त 'याचा' वापर!

पावसाळ्यात अनेक रोग डोकं वर काढतात, त्यामुळे आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सर्दी खोकल्यासाठी घरगुती उपाय ठरतील गुणकारी.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 जून : पावसाचा हंगाम सुरु झाला आहे. पावसाळ्यात अनेक रोग डोकं वर काढतात, त्यामुळे आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पावसाळ्यात अनेकांचा त्रास इतका वाढतो की, त्यामुळे तापही येतो. सर्दी-खोकला पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात सर्वाधिक असतो, त्याचा परिणाम घशावर होतो. कधीकधी  ( Health News ) घशात ऍलर्जी देखील होते, ज्यामुळे खाण्या-पिण्यात त्रास होतो. यावर आपण घरगुती गुणकारी उपाय करु शकतो. कोमट पाणी - वारंवार कोमट पाणी प्यायल्याने सामान्य सर्दी आणि खोकला यांच्या विरुद्ध लढण्यास मदत होते. गरम पाणी प्यायल्याने गळ्याभोवतीची सूज देखील कमी होते. यामुळे घसा खवखवणे आणि संसर्गापासून आराम मिळेल. थंड पाण्याने ही समस्या वाढू शकते. कोमट पाणी प्यायल्याने संसर्ग हळूहळू कमी होतो. हे ही वाचा -  Diabetes: शुगर कंट्रोलसाठी फायदेशीर आहेत ही पानं, नियमित आहारात घेऊन पाहा परिणाम मध -  मधामध्ये अॅंटिबायोटिक गुणधर्म असतात जे घसादुखी, खोकला आणि सर्दीपासून आराम देतात. मधामुळे घसा खवखवणे आणि सूज यांमध्येही आराम मिळतो. मधामुळे घशाला आराम मिळतो. आलं -  आल्याच्या चहामुळे केवळ फ्रेशच वाटत नाही तर सामान्य सर्दी आणि खोकला देखील बरा होण्यास मदत होते. आल्याच्या चहामुळे नाकातून पाणी येणे आणि नाक बंद होणे  यापासून दिलासा मिळतो. शिवाय श्वसनमार्गातून घाण देखील बाहेर पडते. हळद -  हळदीमध्ये अॅंटीबायोटिक आणि अॅंटीसेप्टिक घटक असतात जे जळजळ आणि वेदना कमी करतात. हळद घशासाठी फायदेशीर आहे. हळदीचं दूध पिल्यानं घशाला आराम मिळतो. झोपण्याच्या आधी एक ग्लास गरम हळद दूध प्यायल्याने सर्दी आणि खोकला बरा होतो. सूप -  घसा खवखवल्याने तुमची भूक कमी करू शकते, म्हणून सूप सर्वात प्रभावी ठरतं.  सूपमध्ये कांदे, लसूण आणि अतिरिक्त भाज्या देखील जोडल्या जाऊ शकतात ज्यामुळे चव वाढू शकते. जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत महत्वाचे आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या