JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Pregnancy रोखण्याचा आयुर्वेदिक फॉर्म्युला; मराठमोळ्या लेडी डॉक्टरची Ayurvedic Contraceptive medicine लवकरच बाजारात

Pregnancy रोखण्याचा आयुर्वेदिक फॉर्म्युला; मराठमोळ्या लेडी डॉक्टरची Ayurvedic Contraceptive medicine लवकरच बाजारात

आयुर्वेदिक गर्भनिरोधक औषध टॅब्लेट आणि लिक्विड अशा दोन स्वरूपात उपलब्ध होणार आहे. या औषधाचे कोणतेही साइड इफेक्ट नाहीत.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 मार्च : आरोग्याच्या अनेक लहान-मोठ्या समस्यांवर आपण घरच्या घरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकदा उपचार म्हणून आयुर्वेदात (Ayurveda) सांगितलेल्या वनस्पतींचा वापरदेखील करतो. सध्याच्या काळात आयुर्वेदाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. विविध केमिकल्सचा (Chemicals) समावेश असलेल्या गोळ्यांचे (Tablets) साइड इफेक्ट्स (Side Effects) टाळण्यासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धतींना (Ayurvedic Treatment Methods) प्राधान्य दिलं जात आहे; मात्र अद्यापही गर्भनिरोधकासारख्या (Pregnancy) गंभीर विषयावर आयुर्वेदाचा म्हणावा तसा वापर होत नाही. किंबहुना त्यासाठी शासनाची परवानगीदेखील नाही. लवकरच आता आपल्या देशात गर्भधारणा टाळण्यासाठी हर्बल औषधांचा (Herbal Medicines) वापर होताना दिसू शकतो. महाराष्ट्रातील डॉक्टरने तयार केलेलं आयुर्वेदिक गर्भनिरोधक औषध लवकरच बाजारात येणार आहे. महाराष्ट्रात सहायक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. आशा भाऊसाहेब कदम (सावंत) (Dr. Asha Bhausaheb Kadam) यांना भारत सरकारकडून गर्भनिरोधकाच्या हर्बल फॉर्म्युलाचं पेटंट (Patent) मिळालं आहे. 10 वर्षांच्या प्रदीर्घ रिचर्सनंतर, 18 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांना हे पेटंट मिळवण्यात यश आलं आहे. डॉ. कदम एका विश्वासार्ह औषध कंपनीच्या सहकार्यानं हे औषध बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. त्यांचं हे औषध टॅब्लेट (Tablets) आणि लिक्विड (Liquids) अशा दोन्ही स्वरूपांत उपलब्ध होणार आहे. आयुर्वेदिक पद्धतीनं कुटुंब नियोजन करण्याच्या दृष्टीनं हे मोठं यश मानलं जात आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातल्या कर्जतमधल्या दादा पाटील महाविद्यालयात (Dada Patil College) सहायक प्राध्यापिका असलेल्या डॉ. आशा भाऊसाहेब कदम (सावंत) यांनी यासाठी फॉर्म्युला तयार केला आहे. त्यांचे आतापर्यंत 21 शोधनिबंध (Research Paper) प्रकाशित झाले आहेत. गर्भधारणा टाळण्यासाठी आतापर्यंतचा हा सर्वांत अचूक हर्बल फॉर्म्युला मानला जात आहे. हे वाचा -  Male Infertility: फक्त लाइफस्टाइलच नव्हे; या कारणांनीही पुरुषांमध्ये वांझपणा वाढतोय डॉ. कदम यांनी सांगितलं, की त्यांनी तयार केलेल्या फॉर्म्युल्याची वैज्ञानिक निकषांनुसार चाचणी केली गेली आहे. या औषधाची उंदरांवर चाचणी करण्यात आली, तेव्हा त्याला 100 टक्के यश मिळालं. यानंतर, महिलांवरदेखील या औषधाची चाचणी करण्यात आली. महिलांमध्येसुद्धा या औषधाचा सक्सेस रेट अतिशय चांगला आहे. झी न्यूज हिंदी च्या रिपोर्टनुसार डॉ. कदम यांनी सांगितलं,, औषधाचा फॉर्म्युला 100 टक्के आयुर्वेदिक आहे. झाडांची पानं, साल, बिया इत्यादींच्या मिश्रणाचा तपशीलवार अभ्यास करून हे औषध तयार करण्यात आलं आहे. त्यामध्ये काही औषधी वनस्पतींच्या अर्कांचाही वापर करण्यात आला आहे. अनेक आदिवासी महिलांना या वनस्पतींची माहिती आहे आणि त्या त्यांचा वापरही करतात. औषध तयार झाल्यानंतर ते केंद्र सरकारच्या पुण्यातल्या नॅशनल टॉक्सिकॉलॉजी सेंटरकडे (National Toxicology Center) मंजुरीसाठी सादर करण्यात आलं. विविध तपासण्या आणि चौकशीअंती या हर्बल गर्भनिरोधक औषधाला (Herbal Contraceptive Medicines) मान्यता देण्यात आली आहे. हे वाचा -  डोळस असलेल्यांनाही लगेच जमत नाही ते अंध मुलीने पहिल्याच प्रयत्नात केलं; VIDEO पाहून व्हाल थक्क हे औषध आयुर्वेदिक वनस्पतींपासून तयार केलेलं असल्यामुळे याचा महिलांवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. गर्भधारणा टाळण्यासाठी दिवसातून एकदा हे औषध घ्यावं लागेल. अशा प्रकारे महिन्यातले 21 दिवस नियमितपणे या औषधाचं सेवन करावं लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या