हेल्थ टिप्स
नवी दिल्ली, 20 डिसेंबर : आपलं आरोग्य चांगलं असाव, हाडं मजबूत असावी, केस लांब असावेत, त्वचा चमकदार असावी असं तर सगळ्यांनाचं वाटत. पण, ते सहज शक्य नसतं. वाढत्या वयानुसार, बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी, झोपेच्या सवयी, मानसिक ताण यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. चांगल्या आरोग्यासाठी आपण अनेक उपाय करतो. कधी औषधं कधी होम रेमेडीजही ट्राय करतो. पण, काही घरगुती उपाय खरंच फायदेशीर असतात. असाच एक उपाय आहे साजूक तूप (****Ghee). साजूक तूप खाण्याचे भरपूर फायदे तुम्हाला माहिती असतील पण, रात्री तूप खाल्याने काय फायदा मिळतो हे जाणून घेऊया. रात्री झोपण्याआधी दूध पिणाऱ्यांनी त्यात तूप घालून प्यायल्याने प्रचंड फायदा मिळतो. रोज दुध प्यायल्याने कॅल्शियम मिळतं आणि हाडं मजबूत होतात. दुधामुळे मेटबॉलिजम, स्टॅमिना वाढतो. दुधाप्रमाणे तूपाचेही फायदे आहेत. आयुर्वेदात तर, तुपाला जास्त महत्व दिलं गेलं आहे. त्यामुळे दूध आणि तूप एकत्र घेतल्याने फायदा आणखीन वाढतो. मेटाबॉलिजम वाढतं - दुधात तूप मिसळून प्यायल्याने मिळणारा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे मेटाबॉलिजम (Metabolism) सुधारतं. पचन शक्ती सुधारते. पोट चांगलं राहील तर, अनेक आजार दूर पळतात. चांगली झोप तुपामुळे मनावरचा ताण कमी होतो. गरम दुधात तूप मिसळून प्यायल्याने चांगली झोप येते. दिवसभराच्या थकव्याने किंवा ताणामुळे चांगली झोप येत नसेल तर, दुध आणि तूप घ्यावं. सांधेदुखी होईल बरी ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी रोज दुध आणि तूप यांचं सेवन कराला हवं. तूप हाडांमधली सुज कमी करतं तर, दुधामधून कॅल्शियम मिळतं आणि हाडं मजबूत होतात. हे वाचा - गरोदरपणात महिलांनी अंडी खावीत की नाही? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्किन ग्लो तूप आणि दुधाच्या मिश्रणाचा आणखी एक फायदा म्हणजे यामुळे स्कीन ग्लोईंग होते. दूध आणि तूप नॅचरल मॉश्चरायझरचं काम करतात. रोज संध्याकाळी दूध आणि तूप प्यायल्याने त्वचा तजेलदार बनते. शिवाय ज्यांना उष्णतेचा त्रास असेल. तोंड येण्याची समस्या असेल त्यांनीही हे मिश्रण घ्यावं.
लैंगिक आरोग्य सुधारेल तूप आणि दुध शरीरातील उष्णता कमी करतं. लैंगिक समस्यांमध्ये हे मिश्रण फायदा देतं. त्यामुळे वीर्य उत्पादन वाढतं. ज्यांना लैंगिक समस्या आहेत अशांनी नियमीत दुध आणि तूपाचं सेवन करावं. हे वाचा - हिवाळ्यात रूम हिटर वापरणं ठरू शकतं घातक; हे दुष्परिणाम एकदा नक्की वाचा गर्भवती महिलांसाठी दुध आणि तूप सर्वांसाठी फायदेशीर आहे पण, गर्भावस्थेतल्या महिलांनी रोज दुध आणि तूप घ्यायला हवं. त्याने बाळ आणि आई दोघांनाही फायदा मिळतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)