डायबेटिसवर आयुर्वेदिक उपाय
नवी दिल्ली, 21 डिसेंबर : जगात डायबेटिसचा प्रसार वेगानं होतो आहे. हा आजार बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण झाला आहे. खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयी, अयोग्य वेळा आणि शारीरिक कष्टाचा अभाव यामुळे डायबेटिससारखे आजार मागे लागतात. आनुवंशिकतेतूनही हा आजार पुढच्या पिढीकडे जातो. डायबेटिस म्हणजेच रक्तातल्या साखरेचं बिघडलेलं प्रमाण. ही साखर नियंत्रणात ठेवणं हेच त्यावरचं औषध असतं. मात्र काही आयुर्वेदिक औषधांमुळे 15 दिवसांत डायबेटिस नियंत्रणात येऊ शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. डायबेटिस नियंत्रणात ठेवण्यासाठीचे प्रभावी उपाय सांगणारं वृत्त ‘ नवभारत टाइम्स ’नं दिलं आहे. डायबेटिसमध्ये स्वादुपिंडाचं कार्य प्रभावित झालेलं असतं. स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन तयार केलं जातं. इन्शुलिनमुळे रक्तातली साखर नियंत्रित ठेवली जाते. इन्शुलिन कमी प्रमाणात तयार होत असेल, तर रक्तातली साखर वाढते. यालाच डायबेटिस म्हणतात. डायबेटिस असणाऱ्यांनी नियमितपणे काही उपाय केले, तर 15 दिवसांत रक्तातली साखर नियंत्रणाय येऊ शकते, असं आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांचं म्हणणं आहे. टाईप 1 किंवा टाईप 2 अशा सर्व डायबेटिस रुग्णांना यामुळे फरक पडू शकतो. या उपायांमुळे हृदयरोग किंवा किडनीच्या आजारांतही मदत मिळू शकते. - आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसांतून एकदा धान्य व दुग्धजन्य पदार्थ खाणं टाळा. - जेवणाआधी एक तास किंवा जेवणानंतर 10-20 मिली ऑरगॅनिक अॅपल सीडर व्हिनेगर प्यावं. - रोज सकाळी अनुशापोटी एक चमचा भिजवलेले मेथी दाणे खावेत आणि त्याचा चहा करून प्यावा. - प्यायचं पाणी, चहा तसंच कॉफीमध्ये चिमूटभर दालचिनी पावडर घालावी. - दिवसातून एकदा किमान 20 मिनिटं दीर्घ श्वासनाचे व्यायाम किंवा प्राणायाम करावा. - डायबेटिस नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात लसणाचा समावेश ठेवावा. - कॅफेन, तळलेले पदार्थ, पांढरे तांदूळ, साखर, दारू यांचं सेवन शक्यतो मर्यादित असावं. - ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळं व भाज्या आवर्जून खाव्यात. - रोज पुरेसं पाणी प्यावं. बाजारात मिळणारं डायबेटिसवरील आयुर्वेदिक चूर्ण खूप प्रभावी ठरू शकतं. कडूनिंब, गोक्षुर, गुडुची, मधुनाशिनी, सुंठ, मंजिष्ठा, मारीच, बिल्व, भूमी, आवळकाठी, पुनर्नवा, जांभूळ, कारलं, हरिद्रा, त्रिफळा या डायबेटिसला प्रतिबंध करणाऱ्या औषधांनी ते चूर्ण तयार केलेलं असतं. एखाद्या व्यक्तीची साखर अगदी काठावर असेल व भविष्यात डायबेटिस होण्याची शक्यता असेल, तर त्यांच्यासाठीही हे चूर्ण फायदेशीर ठरू शकतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. टाईप 1, टाईप 2 डायबेटिसलाही नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याची मदत होते. हे वाचा - हे छोटे बदल केल्याने हिवाळ्यातही घर राहील गरम; रूम हिटरची पडणार नाही गरज या चूर्णातल्या आयुर्वेदिक औषधांमुळे कोलेस्टेरॉल कमी करणं, शरीरातली ऊर्जा वाढवणं, रक्तदाब नियंत्रित करणं, चयापचय सुधारणं, आतडं व स्वादुपिंडाचं कार्य सुरळीत ठेवणं यासाठी मदत मिळते. डायबेटिक न्यूरोपॅथी, नेफ्रोपॅथी आणि रॅटिनोपॅथी अशा डायबेटिसमुळे निर्माण होणाऱ्या आजारांवरही त्याचा फायदा होतो.
डायबेटिस रुग्णांनी आहारात काही बदल करणं गरजेचं असतं. तसंच या रुग्णांनी व्यायामही नियमित केला पाहिजे. काही घरगुती उपायांमुळे साखर नियंत्रणात ठेवता येऊ शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)