नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर : सर्दी-ताप, डोकेदुखी, घसादुखी, पोटदुखी अशा किरकोळ समस्यांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. पण, कधी-कधी या छोट्या-छोट्या समस्यांसाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते. थायरॉईड कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे फारच किरकोळ असतात आणि अनेकदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. सहसा थायरॉईड कर्करोगाच्या सुरुवातीला अन्न गिळताना समस्या जाणवते. अनेकांना ही किरकोळ समस्या वाटते आणि काहींच्या बाबतीत असं होतं की, एक-दोन दिवस बरं वाटतं आणि नंतर अध्येमध्ये त्रास होतो. अशा परिस्थितीत कदाचित थायरॉईडचा कर्करोग असू शकतो. त्यामुळे या छोट्याशा समस्येकडे कधीही दुर्लक्ष करू नये. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास मोठा अनर्थ टळू शकतो. थायरॉईड कर्करोग म्हणजे काय? मेयो क्लिनिक च्या मते, थायरॉईड ही मानेच्या तळाशी फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असते. थायरॉईड ग्रंथीमधून हार्मोन्स सोडले जातात जे हृदय गती, रक्तदाब, शरीराचे तापमान आणि वजन नियंत्रित राखतात. थायरॉईड कर्करोगात थायरॉईड ग्रंथीची असामान्य वाढ होते. यामुळे घशात गाठ किंवा लिम्फ नोड दिसू लागतात. सुरुवातीला त्याची लक्षणे दिसत नाहीत पण नंतर हळूहळू गाठीचा आकार वाढत जातो. रिसर्च गेटने अलीकडेच केलेल्या एका अभ्यासात पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉईड कर्करोगाचा धोका वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे. संशोधनानुसार, 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांमध्ये थायरॉईड कर्करोगाचा धोका 121 टक्क्यांनी वाढला आहे.
थायरॉईड कर्करोगाची लक्षणे - थायरॉईड कर्करोगाच्या बाबतीत सुरुवातीच्या काळात क्वचितच लक्षणे दिसतात. जसजसे ते वाढते तसतसे घसा फुगायला लागतो आणि आवाजात अचानक बदल होतो. यानंतर अन्न खाताना गिळताना त्रास होतो. याशिवाय खालील लक्षणे दिसतात - मानेवर गाठ दिसू लागते. फिटिंग शर्ट गळ्यात अधिक घट्ट होत असल्याचे जाणवते. नीट बोलता येत नाही, बोलण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, कधीकधी कर्कश आवाज येतो. खाताना-गिळताना त्रास होतो. मान आणि घशात वेदना जाणवणे.
हे वाचा - हे पदार्थ खाल्ल्यास काही तासांतच वाढतील प्लेटलेट्स; डेंग्यूपासून लगेच होईल सुटका
अशा प्रकारे काळजी घ्या - वास्तविक, थायरॉईड कर्करोगात, थायरॉईड ग्रंथीच्या पेशींमध्ये बदल सुरू होतात, ज्याला उत्परिवर्तन म्हणतात. या प्रक्रियेत निरोगी पेशी मरतात आणि कर्करोगाच्या पेशी त्यांच्या जागी वाढू लागतात. ते हळूहळू ट्यूमरमध्ये वाढते. काही लोकांच्या घरात त्यांच्या नातेवाईकांमध्ये थायरॉईड कर्करोगाचे कुटुंब आहे. अशा लोकांना आवाजात कोणताही बदल किंवा घशात बदल दिसल्यास त्यांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. जर तुम्हाला खाण्यात किंवा बोलण्यात त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा.