मुंबई, 18 ऑक्टोबर : देशातील बहुतांश राज्यांमध्ये पाऊस पडल्यानंतर डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. ऋतू बदलल्याने विषाणूजन्य ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. डेंग्यू सहसा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक कहर करतो. डेंग्यू हा विषाणूजन्य ताप आहे जो एडिस इजिप्ती या संक्रमित डासाच्या चावण्यामुळे मानवांमध्ये पसरतो. डेंग्यूची लक्षणे डास चावल्यानंतर 4-10 दिवसांनी दिसतात. डेंग्यूमध्ये खूप ताप येतो आणि थकवा येतो. डेंग्यूच्या रुग्णांच्या प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होऊ लागते. अशा स्थितीत योग्य उपचार न मिळाल्यास रुग्णाची प्रकृती गंभीर होऊ शकते. आता प्रश्न असा पडतो की डेंग्यू होतो तेव्हा त्यावर नियंत्रण कसे ठेवता येईल? यासंबंधीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे डॉक्टरांकडून जाणून घेऊया.
Food For Healthy Ovaries : हे पदार्थ खाल्ल्याने स्ट्राँग आणि हेल्दी बनेल ओव्हरीज; प्रेग्नन्सीतही समस्या येणार नाहीडेंग्यूमध्ये कोणते औषध फायदेशीर आहे? नवी दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलच्या फिजिशियन डॉ. सोनिया रावत यांच्या मते, डेंग्यू हा विषाणूजन्य ताप आहे, ज्यावर योग्य उपचार केल्यास रुग्ण काही दिवसात बरा होतो. डेंग्यू तापाच्या वेळी लोकांनी त्यांच्या वजनानुसार पॅरासिटामोलची गोळी घ्यावी. याशिवाय डेंग्यू तापामध्ये इतर कोणतेही औषध घेणे हानिकारक ठरू शकते. लोकांना वाटते की प्रतिजैविक म्हणजेच अँटिबायोटिक्स घेणे फायदेशीर ठरेल, परंतु डेंग्यूच्या बाबतीत, असे केल्याने प्लेटलेटची संख्या कमी होईल आणि समस्या वाढेल. बहुतेक प्रकरणांमध्ये, डेंग्यूचा उपचार पॅरासिटामॉलने केला जातो. इतर औषधे गंभीर प्रकरणांमध्ये वापरली जातात.
डेंग्यूवर उपचार कसा करता येईल? डॉ.सोनिया रावत सांगतात की, तुम्हाला ताप आला तर तुम्ही तुमच्या वजनानुसार पॅरासिटामॉलची गोळी घेऊ शकता. पॅरासिटामॉल 15 मिग्रॅ प्रति किलो वजनाने घेतले पाहिजे. उदाहरणार्थ, जर एखाद्याचे वजन 60 किलो असेल, तर ती व्यक्ती 900 मिलीग्रामपर्यंत डोस घेऊ शकते. डेंग्यूच्या बाबतीत रुग्ण दिवसातून 3 किंवा 4 वेळा पॅरासिटामोल औषध घेऊ शकतो. याशिवाय त्याला अधिकाधिक पाणी प्यावे लागेल आणि द्रव आहार घ्यावा लागेल. अधिकाधिक द्रवपदार्थ घेतल्यास डेंग्यूचे रुग्ण लवकर बरे होऊ शकतात. एक-दोन दिवस ताप आल्यावर रुग्णांनी निश्चितपणे रक्त तपासणी करून घ्यावी. जर स्थिती सतत खराब होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
ताप डेंग्यूचा आहे की साधा? लक्षणांमधील या फरकांवरून सहज ओळखा येतंडेंग्यूची लक्षणे - उच्च ताप - शरीर दुखणे - डोकेदुखी होणे - उलट्या होणे - पोटदुखी - विकनेस असणे - जास्त थकवा - प्लेटलेट्स कमी होणे