आरोग्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
मुंबई, 21 डिसेंबर : जगात पुन्हा एकदा कोरोनाचा ससंर्ग वाढत असल्यचं समोर आलं आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. वाढत असलेल्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून नवीन प्रकरणांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्याचे निर्देश दिले आहेत. आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा तसेच उपाययोजना याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे. बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा? आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळावर सुरक्षिततेचे उपाय, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली निश्चित करणे, कोविड-19 च्या नवीन प्रकाराबाबत तज्ज्ञांचे मत, मायदेशी परतणाऱ्या भारतीयांबाबतचे नवे नियम, देशातील कोविड-19 चे सध्याचे प्रकार आणि त्यांची स्थिती, नवीन वर्षाच्या आगमनानिमित्त आयोजित कार्यक्रमात घ्यावयाची खबरदरी असा विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती भारती पवार यांनी दिली आहे. हेही वाचा : चीनमधील कोरोना उद्रेक पाहून केंद्र सरकार सावध! राज्यांना अलर्ट जारी; आपल्याला किती धोका? चीनमध्ये पुन्हा कोरोना संकट सर्व प्रथम कोरोनाचा विषाणू हा चीनमध्ये आढळून आला होता. त्यानंतर त्याचा प्रसार जगभर झाला. अवघे जगच कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. कोरोनाला आळा घालण्यासाठी चीनने कठोर नियमावली बनवली होती. मात्र प्रतिबंध शिथील करताच पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाने डोके वर काढले असून, परिस्थिती गंभीर बनली आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारत सरकार देखील सतर्क झाले असून, आजच्या बैठकीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.