JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / चूलच नव्हे तर स्वयंपाकघरातील गॅसही देतो आजारांना आमंत्रण; भयंकर आजाराचा धोका

चूलच नव्हे तर स्वयंपाकघरातील गॅसही देतो आजारांना आमंत्रण; भयंकर आजाराचा धोका

स्वयंपाकघरातील गॅसही आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं एका संशोधनातून दिसून आलं आहे.

जाहिरात

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात स्टोव्ह, शेगडी नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावी. यामुळे मनःशांती मिळते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,30 जुलै : कॅन्सर अर्थात कर्करोगाबाबत (Cancer) वैद्यकीय क्षेत्रात भरपूर संशोधन सुरू असतं. कर्करोगाची कारणं आणि त्यावरचे नवनवीन उपचार यांच्याविषयीही वेळोवेळी शास्त्रज्ञ अभ्यास करत असतात. विकास आणि जीवनशैलीतला बदल यांची सांगड अनेक शोधांसाठी कारणीभूत ठरते. त्यापैकीच एक शोध स्वयंपाकाच्या गॅसचा आहे. गॅस आणि शेगडीमुळे स्त्रियांची मोठ्या कष्टातून सुटका झाली असं आपण मानतो. मात्र याच गॅसमुळे कर्करोगाची शक्यता बळावते, असं नवं संशोधन सांगतं. स्वयंपाकाच्या गॅसचं (Gas) ज्वलन होताना काही विषारी वायूंचं उत्सर्जन होतं. बेन्झिन (Benezene), टोल्यूनी, एथिलबेन्झिन, झायलिन आणि हेक्सेन हे त्यातून निघणारे वायू कर्करोगाला आमंत्रण देतात. रिपोर्ट नुसार अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात (Howard University) शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आलीय. 28 जून रोजी एन्व्हायर्न्मेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी (Environmental Science And Technology) या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं. या अभ्यासासाठी बोस्टनमधल्या 69 घरांमध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या नॅचरल गॅसचे 239 नमुने घेण्यात आले होते, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. त्या नमुन्यांची तपासणी करणाऱ्या टीमला त्या गॅसमध्ये 21 विषारी वायू आढळून आले आहेत. त्यात बेन्झिन, टोल्यूनी, एथिलबेन्झिन, झायलिन आणि हेक्सेन हे प्रमुख विषारी वायू होते. हे वाचा -  वॉशिंग मशिनखाली बेस लावण्याचे काय आहेत फायदे? बेस घेण्याआधी ‘या’ गोष्टी नक्की लक्षात घ्या केवळ गॅसच नाही, तर पेट्रोल, डिझेल किंवा एखादं लाकूड जरी जाळलं, तरी त्यातून रासायनिक प्रक्रिया होऊन वायू बाहेर पडतात, असं दिल्लीतल्या उजाला-सिग्नस रुग्णालयाचे प्रमुख डॉ. सुचिन बजाज यांचं म्हणणं आहे. एलपीजी गॅस जाळल्यानंतर त्यातून बेन्झिन हा Carcenogenic म्हणजे कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरू शकेल अशा प्रकारचा वायू उत्सर्जित होतो. डॉ. बजाज यांच्या म्हणण्यानुसार, परदेशात नॅचरल गॅस स्वयंपाकासाठी वापरला जातो. भारतात एलपीजी अधिक वापरला जातो. त्यात प्रोपेन या गॅसचं प्रमाण जास्त असतं. हा गॅस जाळल्यानंतर जो बेन्झिन वायू उत्सर्जित होतो, त्याचं प्रमाण परदेशातल्या नॅचरल गॅसच्या ज्वलनातून तयार होणाऱ्या बेन्झिनच्या तुलनेत खूप कमी आहे. तज्ज्ञ डॉक्टर राजेश गेरा यांच्या म्हणण्यानुसार, स्वयंपाकघरात हवा खेळती राहणं जरूरीचं आहे. स्वयंपाक करताना दारं-खिडक्या उघड्या ठेवल्या पाहिजेत. म्हणजे घरात धूर पसरत नाही. तसंच चिमणी किंवा एक्झॉस्ट फॅनचा वापरही केला पाहिजे. म्हणजे स्वयंपाकघरातले प्रदूषित वायू बाहेर टाकले जातील. हे वाचा -  इलेक्ट्रिक वस्तूंची तिसरी पिन वाचवते तुमचा जीव; असं आहे मुख्य काम अशा प्रकारचा Carcenogenic गॅस नाक किंवा तोंडावाटे शरीरात गेला, तर त्याचा फुप्फुसावर परिणाम होतो. कर्करोगाव्यतिरिक्त अस्थमा, ब्राँकायटिस, धाप लागण्याचा त्रास होऊ शकतो, असं पारस रुग्णालयाचे श्वासरोग तज्ज्ञ डॉ. अरुणेश कुमार यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या