JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Health Tips: शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी डबा बनवताय? 'या' हेल्दी टिप्स एकदा पाहाच

Health Tips: शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी डबा बनवताय? 'या' हेल्दी टिप्स एकदा पाहाच

मुलांच्या वाढीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी पौष्टिक आहार (Nutritious meals) महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुलांचा जेवणाचा डबा अशाप्रकारे तयार केला पाहिजे की त्यांना ते खाण्यात मजा येईल आणि त्यांना पुरेसं पोषणही मिळेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 जुलै :  मुलांच्या वाढीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी पौष्टिक आहार (Nutritious meals) महत्त्वाचा आहे. कोरोना महामारीनंतर (Corona Pandemic) दोन वर्षांनी आता शाळा (School) पुन्हा सुरू झाल्या आहेत. कोरोना अजून संपलेला नाही, त्यामुळे मुलांना शाळेत पाठवताना पालकांनी त्यांच्या स्वच्छतेची आणि सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. तसंच त्यांना विविध प्रकारच्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या आहारावर विशेष लक्ष द्यायला हवं. पालकांनी मुलांची इम्युनिटी पॉवर वाढावी म्हणून सकस आहार द्यायला हवा. त्यामुळे मुलांचा जेवणाचा डबा अशाप्रकारे तयार केला पाहिजे की त्यांना ते खाण्यात मजा येईल आणि त्यांना पुरेसं पोषणही मिळेल. याबद्दलच काही टिप्स हिंदुस्थान टाईम्सने दिल्या आहेत.

फ्रोझन आणि इन्स्टंट फूड नको

मुलांच्या डब्यामध्ये फ्रोझन आणि इन्स्टंट फूडच्या (frozen and instant food ) जागी नेहमी ताजे आणि घरी केलेले अन्नपदार्थ ठेवा. दुपारच्या जेवणासाठी त्यांना ताजी (fresh fruits) आणि हंगामी फळं देऊ शकता. तसंच पिण्यासाठी पाण्याव्यतिरिक्त, ताक, थंडाई, कैरीचं पन्हं, मिल्कशेक आणि ताज्या फळांचा ज्युस द्या, यामुळे मुलं हायड्रेटेड (hydrated) राहतील.

जेवणात व्हरायटी द्या

जेवणात रोज फक्त पोळी आणि भाज्या खाण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे त्यात व्हरायटी आणण्याचा प्रयत्न करा. पराठे साधे करण्यापेक्षा त्यात भाज्या घाला. हिरव्या भाज्या, कडधान्य, पनीर किंवा टोफू पिठात मिसळून त्याचे पराठे करा किंवा ते स्टफिंग वापरून काठी रोल, पनीर रॅप्स तयार करा. यामुळे त्या पदार्थांचं पौष्टिक मूल्य वाढेल. तसंच जेवण तयार करण्यासाठी पारंपरिक मसाले वापरण्याऐवजी पेरी-पेरी मसाला किंवा मॅगी मसाला वापरा.

ड्रायफ्रूट्स आणि इतर पदार्थ डब्यात द्या

मुलांची शाळा दिवसभर असेल तर त्यांना दुपारच्या जेवणापूर्वी भूक लागते. हल्ली तर मधल्या काळात 10-15 मिनिटांची छोटी सुट्टीही दिली जाते. या वेळेत खाण्यासाठी तुम्ही त्यांना फळं, मोड आलेली कडधान्यं, मठरी, खारे काजू, ड्रायफ्रुट्स (Dry Fruits) देऊ शकता. यासाठी जेवणाच्या डब्याशिवाय एक छोटा डबा कायम मुलांच्या स्कूलबॅगमध्ये ठेवा.

भरपूर भाज्या वापरा

नूडल्स (Noodles), पास्ता किंवा स्प्रिंग रोल यांसारखे पदार्थ बनवताना त्यामध्ये भरपूर भाज्या वापरा. मोड आलेली कडधान्यं, शेंगदाणे, मटार आणि कॉर्न हेही वापरता येतील. भाज्यांमुळे मुलांना एनर्जी मिळते, तसंच त्या मुलांना दीर्घकालीन आजार होण्यापासून त्याचं संरक्षण करतात.

निरोगी पर्याय निवडा

मुलांसाठी मिठाई किंवा गोड पदार्थ तयार करताना तुम्ही साखरेऐवजी गूळ किंवा खजूर टाकू शकता. तसंच भरपूर ड्रायफ्रुट्स वापरू शकता. त्याचप्रमाणे केक (Cake) आणि कुकीजसाठी मैद्याऐवजी नाचणीचं पीठ किंवा ओटमील (Oatmeal) वापरा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या