JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / दुधासोबत करा या पदार्थाचं सेवन, वैवाहिक जीवनासाठी ठरेल शक्तीवर्धक!

दुधासोबत करा या पदार्थाचं सेवन, वैवाहिक जीवनासाठी ठरेल शक्तीवर्धक!

भारतीय आहारशास्त्रात (Diet) अनेक आजारांना केवळ अन्नाच्या माध्यमातून कसं बरं करता येईल, हे सुचवण्यात आलं आहे. ऋतुमानाप्रमाणे फळं व भाज्यांचा आहारात समावेश करणं हे तर सर्वांनाच माहीत आहे.

जाहिरात

उच्च कोलेस्टेरॉलमध्ये दुग्धजन्य पदार्थ, जास्त स्निग्धांशयुक्त दूध, चीजसारख्या पदार्थांचं सेवन करू नये. यामुळे शरीरात अधिक कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका असतो.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 मे : भारतीय जीवनशैलीत आहाराला प्रचंड महत्त्व आहे. तुम्ही जे अन्न खाता तसे तुम्ही घडता म्हणजे तुमचं मन तसेच विचार करतं असं म्हटलं जातं. त्यामुळे भारतीय जीवनात खूप शुद्ध, सात्विक आहार घेतला जातो. आयुर्वेदही अशाच आहाराचं महत्त्व वारंवार सांगतो. सध्या कोविडनंतर प्रत्येकच जण आपल्या तब्येतीबद्दल जागरूक झाला आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती आणि चांगली तब्येत राखण्यासाठी काहीतरी घरगुती उपाय प्रत्येकच जण शोधत असतो. भारतीय आहारशास्त्रात (Diet) अनेक आजारांना केवळ अन्नाच्या माध्यमातून कसं बरं करता येईल, हे सुचवण्यात आलं आहे. ऋतुमानाप्रमाणे फळं व भाज्यांचा आहारात समावेश करणं हे तर सर्वांनाच माहीत आहे, पण त्याव्यतिक्त आपल्याकडे उपलब्ध असणारे मसाले, सुकामेवा, दुध व दुधाचे पदार्थ, फुलं यांच्यापासून शरीराला आवश्यक असणारी पोषणमूल्यं कशी मिळतील, याचाही विचार आहारशास्त्रात केला गेला आहे. सामान्यपणे खीर, मिठाईचे पदार्थ किंवा लाडू या पदार्थांमध्ये सुकामेवा वापरला जातो. लहान मुलांना दुधासोबत खारीक, बदाम, काजू, पिस्ते यांची पूड करून देतात. त्यामुळे त्यांची शक्ती वाढते. दुधासोबत सुकामेवा (Dried Dates with Milk) खाल्ल्याने मोठ्यांनाही त्याचे चांगले फायदे मिळू शकतात. विशेषतः दुधासोबत खारीक खाण्याचे फायदे अनेक आहेत. याचा दाम्पत्याच्या वैवाहिक जीवनासाठीही विशेष लाभ होतो. झी न्यूज हिंदीच्या वृत्तात याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. खारीक बहुउपयोगी पदार्थ आहे. नियमित व योग्य प्रमाणात सेवन केल्यास केवळ महिलांनाच नाही, तर पुरुषांसाठीही ही खारीक उत्तम बलवर्धक असते. अनेक आजारांवर याचा फायदा होतो. वैवाहिक जीवनातही खारीक उपयुक्त ठरते. ही खारीक दुधातून खाल्ल्यास त्याचा फायदा अधिक होतो. अशी ही बहुउपयोगी खारीक खाण्यामुळे होणारे फायदे आपण आज जाणून घेऊया. - दुधासोबत खारीक खाल्ल्यामुळे शरीराची झीज भरून निघते. खारीक बलवर्धक असल्याने जोडप्याच्या वैवाहिक जीवनातही खारीक सेवानाने फायदा होऊ शकतो. - नियमित व्यायाम करणाऱ्यांसाठी खारीक खूप चांगली असते. याच्या सेवनामुळे स्नायू मजबूत (Strength in Muscles) होण्यास मदत होते. - बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास असणाऱ्यांसाठी खारीक फायदेशीर ठरते. दुधासोबत खारीक खाल्ल्याने या हा त्रास कमी होतो. - पुरुषांचा स्टॅमिना (Increase Stamina) वाढण्यासाठी दुधासोबत खारीक खावी, असा सल्ला दिला जातो. खारीक खाण्यामुळे इतरही अनेक फायदे होतात. मधुमेही रुग्णांना रक्तशर्करा नियंत्रित ठेवण्यासाठी दूध व खारीक खाण्याचा फायदा होतो. शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी असेल, तर त्यावरही दूध व खारीक गुणकारी ठरते. नियमितपणे हे सेवन केल्यास याचा नक्कीच लाभ मिळू शकेल. त्वचा व केसांच्या आरोग्यासाठीही खारीक-दूध फायदेशीर असतं. खारकेमधील पोषणमूल्यांचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी ती दुधातून खाणं हितावह असतं. आजकाल बाजारात खारकेची तयार पावडरही उपलब्ध असते. त्यामुळे सहज उपलब्ध असणारी, गुणकारी खारीक आपल्या आहारात असायलाच हवी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या