JOIN US
मराठी बातम्या / गोवा / छातीत दुखत असल्याचे सांगणारे नितेश राणे पंतप्रधानांच्या सभेला गोव्यात पोहोचले!

छातीत दुखत असल्याचे सांगणारे नितेश राणे पंतप्रधानांच्या सभेला गोव्यात पोहोचले!

नितेश राणे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करताच “मी सभा सोडून जाऊ का?”

जाहिरात

नितेश राणे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करताच “मी सभा सोडून जाऊ का?”

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गोवा, 10 फेब्रुवारी :  शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात (Shivsainik Santosh Parab attack case) भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) छातीत दुखत असल्यामुळे जेलमध्ये न जाता हॉस्पिटलमध्ये होते. पण, अचानक नितेश राणे गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला हजर झाले. त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंना जामीन मिळाला आहे. पण छातीत दुखत असल्याचे कारण देऊन नितेश राणे जेलमध्ये गेले नाही.  तब्येत बरी नाहीये आणि छातीत दुखतंय म्हणुन जेलमध्ये न जाता जिल्हा रुग्णालयात मुक्काम केला होता. पण अचानक नितेश राणे हे गोव्यात दिसले. गोवा राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन केले गेले होते. त्या सभेला आमदार नितेश राणे उपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. एकाएकी नितेश राणे यांची तब्येत कशी बरी झाली असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय?  न्यूज १८ लोकमतने नितेश राणे यांचे चित्रिकरण करण्यास सुरुवात केली आणि त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न  करताच “मी सभा सोडून जाऊ का?” असा रागव्यक्त केला आणि त्यांनी बोलण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, सूत्रांच्या माहितीनुसार, नितेश राणे गोव्याच्या दिशेने संध्याकाळीच रवाना झाले होते. नितेश राणे पडवे येथील sspm रुग्णालयात पोहोचल्यानंतर काहीच वेळात देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. ‘पंतप्रधान मोदींची गोव्यातील सभा संपल्यावर भेटूया’ असे बोलल्याचे समजते. त्यानंतर नितेश राणे तात्काळ गोव्याच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते. मात्र निघताना कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. विशेष म्हणजे, आजारापणावरून नितेश राणे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता खुद्द नितेश राणे गोव्यात हजर झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जात आहे. मी पेनकिलर खाऊन सभेला आलो - नितेश राणे दरम्यान, ‘आपली तब्येत बरी नाही, तरीही आपण फक्त आपल्या नेत्या करता पंतप्रधान मोदी यांच्या सभेला पेनकिलर गोळ्या खाऊन आलोय, असं स्पष्टीकरण नितेश राणे यांनी न्यूज १८ लोकमतशी बोलताना दिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या