मराठी बातम्या / बातम्या / goa / Goa Election: निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या कार्यालयात आढळला गांजा, छापेमारीत एकाला अटक

Goa Election: निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या कार्यालयात आढळला गांजा, छापेमारीत एकाला अटक

Goa Assembly Election: ऐन निवडणुकीची धामधूम शिगेला पोहोचली असताना, गोवा पोलिसांनी प्रशांत किशोर (Raid at Prashant kishor's Office) यांच्या काही कार्यलयांवर छापेमारी केली आहे.

Goa Assembly Election: ऐन निवडणुकीची धामधूम शिगेला पोहोचली असताना, गोवा पोलिसांनी प्रशांत किशोर (Raid at Prashant kishor's Office) यांच्या काही कार्यलयांवर छापेमारी केली आहे.


पणजी, 12 फेब्रुवारी: सध्या गोव्यात निवडणुकीची (Goa Assembly Election) धामधूम सुरू आहे. अनेक राजकीय पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले असून विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गोव्यात तृणमूल काँग्रेसला निवडून आणण्यासाठी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची I-PAC ही संस्था ग्राउंडला काम करत आहे. ऐन निवडणुकीची धाकधूक शिगेला पोहोचली असताना, गोवा पोलिसांनी प्रशांत किशोर यांच्या काही कार्यलयांवर छापेमारी (Raid at Prashant kishor's Office) केली आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी पोरवोरिम शहरातून प्रशांत किशोर यांच्या एका कर्मचाऱ्याला अटक (Accused Employee Arrest) केली आहे. तसेच पोलिसांनी आरोपीकडून काही अमली पदार्थ देखील जप्त (cannabis seized) केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांनी शुक्रवारी पोरवोरिम शहरातील अनेक बंगल्यांवर छापे टाकले आहेत. येथील 8 बंगले I-PAC या संस्थेनं भाड्यानं घेतले आहे. येथूनच गोव्यातील निवडणुकीच कामकाज पाहिलं जात आहे. या छापेमारीत गोवा पोलिसांनी I-PAC च्या एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

हेही वाचा-अरे बाप रे! आठवलेंचा शशी थरूरना इंग्रजीबद्दल सल्ला; स्पेलिंगच्या चुकाही काढल्या

तुमच्या शहरातून (गोवा)

गोव्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना, रिसॉर्टमध्ये डच महिलेसोबत भयंकर घडलं

संतापजनक! मुंबईत कोरियन मुलीच्या छेडछाडीनंतर गोव्यात विदेशी महिलेसोबत थेट..

मुलीनं केली कमाल! मायक्रोसॉफ्टनं दिलं बंपर पॅकेज; 8-10 लाख नव्हे सॅलरीचा आकडा बघून व्हाल थक्क

Airplane Emergency Landing : गोवा-हैदराबाद विमानात अचानक धुराचे लोट; Emergency लँडिंग, धक्कादायक VIDEO

Goa Politics : काँग्रेस सोडलेले गोव्याचे 7 आमदार अमित शहांच्या भेटीला, मोठ गिफ्ट मिळणार?

मुंबईतून गोवा, कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, लवकरच वाहतूक कोंडी संपणार

आता गोव्यात 'काय हाटील, काय डोंगर'चं सत्र सुरू! काँग्रेस आमदारांना चेन्नईला हलवलं

गोव्यातील कर्ली क्लब पाडण्यास सुरुवात; याच क्लबमधील पार्टीनंतर झालेला सोनाली फोगटचा मृत्यू

Goa Tourism : गोवा फिरण्यासाठी जातायेत? 'या' ठिकाणी होईल मोफत राहण्याची सोय

पोटात गर्भ वाढत असताना पतीने थेट पत्नीवर घातल्या गोळ्या…, कारण ऐकून बसेल धक्का

घरात न सांगता व्हॅलेटाईन साजरा करण्यासाठी प्रेमी युगुल गोव्याला गेलं अन् परत आलेच नाहीत

अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचं वय 28 आहे. पोलिसांनी त्याच्यावर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.खरंतर, गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर गोव्यात टीएमसी पक्षासाठी रणनीती तयार करण्याचं काम करत आहेत. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोवा पोलिसांकडून त्यांच्या बंगल्यांवर छापेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे गोव्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

हेही वाचा-''हिजाबवर हात टाकणाऱ्यांचे हात कापून टाकू'', महिला नेत्याचं वादग्रस्त विधान

असं असलं तरी काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर आणि तृणमूल काँग्रेसमधील संबंध बिघडल्याच्या बातम्या आल्या होत्या. प्रशांत किशोर यांचं एखाद्या राजकीय पक्षाशी संबंध बिघडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अनेक राजकीय पक्षांसोबतचा त्यांचा वाद चव्हाट्यावर आला होता.

First published: February 12, 2022, 12:27 IST
top videos
  • Pune News : पुणेकर कधीच हार मानत नाही! वयाच्या 59 व्या वर्षी दिली दहावीची परीक्षा VIDEO
  • Ashadhi Wari 2023: अवघीच तीर्थे घडली एक वेळा.., संत तुकाराम महाराजांच्या वंशजांचा तरुणाईला संदेश, Video
  • Sangli News: नोकरी नाही, घेतल्या गाई; मयूर करतोय लाखोंची कमाई, Video
  • Mumbai News : पावसाळ्यात पाय जपण्यासाठी शूज हवेत? ‘या’ मार्केटमध्ये करा सर्वात स्वस्त खरेदी, Video
  • Dombivli News : लोक जिथे फेकत होते कचरा, तिथेच असं काही उभारलं की परिसर झाला स्वच्छ!
  • Tags:Crime news, Goa Election 2021, Prashant kishor

    ताज्या बातम्या

    सुपरहिट बॉक्स