ब्रिटन, 16 सप्टेंबर : जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोनाचा (Corona) कहर पाहायला मिळत आहे (Corona pandemic end). भारतातदेखील कोरोनाच्या (Coronavirus) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम दिसून आला. अशातच आता देशात तिसरी लाट (Corona Third Wave) येण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मास्क (Mask), सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) आणि लॉकडाउन (Corona Lockdown) या तीन गोष्टी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनल्या आहेत. कोरोनामुळे वैद्यकीय यंत्रणेवर मोठा ताण असल्याचं दिसतं. लसीकरणमुळे (Corona Vaccination) काहीसा दिलासा मिळत असला, तरी या सर्व पार्श्वभूमीवर कोरोना कधी जाणार, कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांतून आपली सुटका कधी होणार, की आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागणार असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. ब्रिटनमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट एंग्लियातील तज्ज्ञ पॉल हंटर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी `द कॉन्व्हर्सेशन` या रिसर्च जर्नलमध्ये म्हटलं आहे, की या महासाथीबाबत (Pandemic) आत्ताच नेमकेपणानं भाष्य करणं अवघड आहे. तथापि, येत्या काळात हा साथीचा रोग कसा प्रगती करेल, याबद्दल काहीशी वास्तववादी आशा निर्माण करण्यासाठी पुरेसे पुरावे सध्या आहेत, असं वृत्त पीटीआयने दिलं आहे. भयावह जागतिक महासाथ निर्माण होण्याची ही पहिली वेळ नाही. 1889 मध्ये आढळलेला रशियन फ्लू प्रत्यक्षात इन्फ्लुएंझा नव्हता, तर ओसी-43 या दुसऱ्या कोरोना विषाणूमुळे झाला होता, असा अंदाज लावला जात आहे. रशियन फ्लूच्या जागतिक महासाथीच्या पाच वर्षांत सुमारे चार ते पाच लाटा आल्या आणि त्यानंतर ती नाहीशी झाली. यामुळे इंग्लंड आणि वेल्समध्ये 1890 ते 1891 दरम्यान सर्वाधिक नागरिक मृत्युमुखी पडले. ओसी-43 चा संसर्ग आजही होताना दिसतो. परंतु यामुळे गंभीर स्वरूपात आजारी पडणं दुर्मिळ मानलं जात आहे. हे वाचा - क्रिकेटप्रेमींनो लक्ष द्या! कोरोना लस घेतली असेल तरच पाहता येणार IPL 2021 सद्यस्थिती बघता कोविड-19 च्या संसर्गासाठी कारणीभूत ठरणारा सार्स- सीओव्ही 2 विषाणूसुद्धा असाच राहिलं, असा निष्कर्ष या विषाणूवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी काही महिन्यांपूर्वी मांडला होता. कोणतीही लस किंवा नैसर्गिक संसर्ग विषाणूचा प्रसार थांबवू शकणार नाही, असंही या निष्कर्षात म्हटलं होतं. कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होणार नाही लसीकरणामुळे विषाणू संसर्गाचा प्रसार घटतो. परंतु, विषाणू पूर्णपणे नष्ट होत नाही. डेल्टा व्हॅरिएंट (Delta Variant) दिसून येण्यापूर्वी लशीचे दोन डोस घेतलेल्यांना पुन्हा संसर्ग होत असल्याचं आणि त्याचा प्रसार होत असल्याचं दिसून आलं आहे. विषाणूच्या अन्य व्हॅरिएंट्सच्या तुलनेत डेल्टा व्हॅरिएंटचा सामना करण्यात लस निष्प्रभ ठरत असल्याचं स्पष्ट होत असून, यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हे वाचा - Corona Updates: चीनमध्ये लॉकडाऊन RETURNS, अमेरिकेत पुन्हा कडक निर्बंध लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर काही आठवड्यांत संसर्गाला विरोध करणारी प्रतिकारशक्तीदेखील कमी होऊ लागते. संसर्गाला विरोध करणारी प्रतिकारशक्ती पूर्ण किंवा कायमस्वरूपी नसल्यानं `हर्ड इम्युनिटी` अशक्य आहे. याचा अर्थ असा की कोविड-19 स्थानिक पातळीवर असण्याची शक्यता असून, ज्यात दैनंदिन संसर्गाचं प्रमाण संपूर्ण लोकसंख्येत किती प्रतिकारशक्ती आहे यावर अवलंबून असतं. देशावर अवलंबून आहे कोरोना महासाथीचा अंत कोविड -19 (Covid -19) कसा संपेल हे प्रत्येक देशानुसार वेगळं असेल. ते मुख्यत्वे रोगप्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांचं प्रमाण आणि साथीच्या प्रारंभापासून किती संसर्ग झाला, तसंच नागरिकांमध्ये किती प्रमाणात नैसर्गिकरीत्या रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली यावर अवलंबून असतं. हे वाचा - आईचा नको तो लढा लेकीच्या जीवावर बेतला; कोरोनाग्रस्त चिमुकलीचा झोपेतच मृत्यू यूकेसह अन्य देशांमध्ये जिथे बहुतांश लोकसंख्येचं लसीकरण झालं आहे आणि मागील काळातली रुग्णसंख्या जास्त आहे, तिथल्या नागरिकांमध्ये विषाणू (Virus) विरोधात काही प्रमाणात का होईना, पण रोग प्रतिकारकशक्ती (Immunity) तयार झालेली असेल. आधीच प्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांमध्ये कोविड-19 कमी गंभीर असल्याचं दिसून आलं आहे आणि नैसर्गिकदृष्ट्या दुसऱ्यांदा संसर्ग किंवा लशीच्या बूस्टर डोसमुळे (Booster Dose) वेळोवेळी अधिकाधिक लोकांची प्रतिकारशक्ती वाढते, म्हणून नवीन संसर्गाचं वाढतं प्रमाण लक्षणविरहित किंवा सौम्य लक्षणांसह आहे. त्यामुळे विषाणू राहतील, पण आजार इतिहासजमा होईल. ज्या देशांमध्ये पहिल्या टप्प्यात कोरोनाबाधितांची संख्या अधिक नव्हती, तिथं लसीकरणानंतरही बहुतांश नागरिक अतिसंवेदनशील असतील. परंतु, रशियन फ्लूपासून (Russian Flu) शिकण्यासारखा धडा म्हणजे येत्या काही महिन्यांत कोविड-19चा प्रभाव कमी होईल आणि बहुतेक देशांनी महामाथीची ही कठीण परिस्थिती पार केलेली असेल. जगातल्या असुरक्षित लोकसंख्येला लस देणं गरजेचं ठरणार आहे. हे वाचा - Coronavirus : कोरोना महामारी कधी संपेल? WHO च्या उत्तरानं वाढवली चिंता अन्य मानवी कोरोनाव्हायरसमुळं सरासरी दर तीन ते सहा वर्षांनी वारंवार साथ येते. सार्स -सीओव्ही-2 असाच असेल तर त्याचा अर्थ असा की ब्रिटनमध्ये 16.6 टक्के आणि एक तृतीयांश नागरिक म्हणजेच सरासरी 1.1 ते 2.2 कोटी नागरिक दर वर्षी आणि 30 हजार ते 60 हजार नागरिक दररोज संक्रमित होऊ शकतात. मात्र हा आकडा वाटतो तितका भीतीदायक नाही.