JOIN US
मराठी बातम्या / Explainer / व्हॅलेंटाईन वीकमध्ये Rose Day ची गोष्ट माहितीय का? कपल्स का पाहतात आतुरतेने वाट?

व्हॅलेंटाईन वीकमध्ये Rose Day ची गोष्ट माहितीय का? कपल्स का पाहतात आतुरतेने वाट?

Valentine Week : रोझ डेच्या (Rose Day) दिवशी जोडपे एकमेकांना गुलाब देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी रोझ डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि 14 फेब्रुवारीला संपतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात Rose Day ने होते. या दिवशी लोकं आपल्या जोडीदाराला रोज देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. जोडपी वर्षभर व्हॅलेंटाईन वीकची वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि 14 फेब्रुवारीपर्यंत चालतो. Rose Day दरवर्षी 7 फेब्रुवारीला साजरा केला जातो. रोझ डेच्या (Rose Day 2022) काही दिवस आधी बाजारात लाल, पिवळा, गुलाबी, पांढरा असे अनेक रंगाचे गुलाब बाजारात उपलब्ध होत आहेत. रोझ डे हा तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी खूप चांगला दिवस मानला जातो. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला रोझ डे का साजरा केला जातो हे सांगणार आहोत. रोझ डे का साजरा केला जातो? रोझ डेच्या दिवशी लोकं त्यांचे प्रेम त्यांच्या आवडीच्या लोकांप्रती व्यक्त करतात. या दिवशी लोक समोरच्या व्यक्तीला गुलाब देऊन आपल्या भावना व्यक्त करतात. रोझ डेचा इतिहास (Rose Day History) गुलाबाचे फूल हे आपल्या भावना व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की मुघल बेगम नूरजहाँला लाल गुलाब खूप आवडत होते. असे म्हणतात की नूरजहाँचे मन प्रसन्न करण्यासाठी तिचा नवरा रोज ताजे गुलाब तिच्या वाड्यात पाठवत असे. दुसर्‍या मान्यतेनुसार, राणी व्हिक्टोरियाच्या काळात, लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबांची देवाणघेवाण करण्याची परंपरा सुरू केली. असे मानले जाते की व्हिक्टोरियन आणि रोमन देखील गुलाबाने त्यांचे प्रेम व्यक्त करायचे. गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांचे वेगवेगळे अर्थ आहेत. अशा परिस्थितीत रोझ डेच्या दिवशी एखाद्याला गुलाब देताना समोरच्या व्यक्तीला आपण देत असलेल्या गुलाबाचा अर्थ काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत गुलाबाचा रंग म्हणजे काय, याचा अर्थ काय ते जाणून घेऊया. Valentine’s Day दिवस आधी आकाशात दिसणार विलोभनीय दृश्य; अजिबात चुकवू नका ही संधी लाल गुलाब (Red Rose)-  लाल गुलाब प्रेम, उत्कटता आणि भावनांशी संबंधित आहेत. लाल गुलाबाची खासियत म्हणजे ते देऊन तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे याची जाणीव करून देतो. पिवळा गुलाब (Yellow Rose)- पिवळा गुलाब हे मैत्रीचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला तुमच्या मित्रांना सांगायचे असेल की तुमचे त्यांच्यावर प्रेम आहे तर तुम्ही त्यांना पिवळे गुलाब देऊ शकता. पिवळा रंग आनंद आणि चांगले आरोग्याचे देखील प्रतीक आहे. पांढरा गुलाब (White Rose)- पांढरा गुलाब त्यावेळी दिला जातो जेव्हा तुमचं कोणाशी खूप भांडण झालं असेल पण आता तुम्हाला सर्व काही विसरून नवीन पद्धतीने नात्याची सुरुवात करायची आहे. याशिवाय पांढरा गुलाब शांततेचे प्रतीक मानला जातो. पिंक गुलाब (Pink Rose) - व्हॅलेंटाईन डे फक्त जोडप्यांसाठी नाही. तुम्ही तुमच्या पालकांसोबतही तो साजरा करू शकता. अशा परिस्थितीत, गुलाब दिनाच्या दिवशी तुम्ही त्यांना गुलाबी गुलाब देऊ शकता. एखाद्याचे आभार मानण्यासाठी गुलाबी गुलाब दिले जातात. ऑरेंज गुलाब (Orange Rose)- हा गुलाबी रंग उत्कटतेचे प्रतीक आहे. हे उत्साह, इच्छा दर्शवते. जोडपे त्यांच्या प्रेमात उत्कटता आणि उत्साह आणण्याचे प्रतीक म्हणून नारिंगी गुलाब देऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या