रॅपिडो ड्रायव्हरचा रात्री दीडला महिलेला व्हॉट्सअॅपवर मॅसेज
नवी दिल्ली, 15 मार्च : लोक आपला वेळ वाचवण्यासाठी आणि लवकर पोहोचण्यासाठी ऑनलाइन वाहतूक सुविधा वापरतात. Ola, Uber, Rapido सारख्या सेवा लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. पण, अनेकदा या चालकांकडून ग्राहकांशी गैरवर्तन केल्याच्या घटना घडल्या आहेत. एका तरुणीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सोशल मीडियावर पोस्ट केल्याने ही घटना समोर आली आहे. एका रॅपिडो चालकाने महिलेला व्हॉट्सअॅपवर असभ्य भाषेत मॅसेज केला आहे. तरुणीने ड्रायव्हरच्या चॅटचे काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ‘हुस्नपरी’ नावाच्या युजरने मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर एका संदेशाद्वारे आपला संताप व्यक्त केला. हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर आता अनेक यूजर्सनी महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
काय आहे प्रकरण? हुस्नपरी नावाच्या युजरने ट्विटरवर रॅपिडो ड्रायव्हरने तिला पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये पहाटे दीडच्या सुमारास आरोपी ड्रायव्हरने तरुणीला मेसेज केल्याचे दिसून येते. त्याने लिहिले, ‘हॅलो, झोपी गेलीस… फक्त तुझा DP बघून आणि तुझ्या आवाजामुळे आलो होतो… नाहीतर लोकेश दूर होतं, नसतो आलो…. आणि हो एक गोष्ट मी भाऊ? कंपनीने दिले उत्तर या प्रकरणानंतर रॅपिडो केअर्सनेही ट्विटद्वारे प्रतिक्रिया देत लिहिले की, ‘आम्ही हे जाणून खूप निराश झालो. कॅप्टनमध्ये व्यावसायिकतेचा अभाव आहे. या घटनेबद्दल आम्ही दिलगीर आहोत. यावर नक्कीच कारवाई केली जाईल. इतकेच नाही तर कंपनीने युजरला तिचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि रायडरचा आयडी देखील विचारला आहे. वाचा - क्रुरतेचा कळस! डॉक्टरने थेट ड्रायव्हरचे करवतीने 70 तुकडे केले, कारणही भयानक महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर नुकतेच एका स्विगी डिलिव्हरी बॉयने एका महिलेसोबत असेच असभ्य वर्तन केलं होतं. त्याने एका महिलेला किराणा सामान पोहच केल्यानंतर तिला मॅसेज केले होते. हे प्रकरण ताजे असतानाच हे घडल्याने नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.