न्यूयॉर्क, 28 फेब्रुवारी : पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हापासूनच त्यामध्ये अनेक प्रकारचे बदल होत आहेत. अंतराळातील छोट्याछोट्या घटनांचा अभ्यास पृथ्वीवरचे वैज्ञानिक अगदी बारकाईनं अभ्यास करतात. कारण त्याचा पृथ्वीवर काही ना काही परिणाम होतोच. काहीवेळेस पृथ्वीवर अवकाशातून उल्का पडतात. (Asteroid Hit Earth). पृथ्वीवर अवकाशातून पडलेल्या या दगडांचा अभ्यास करून वैज्ञानिक अवकाशातील रहस्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका प्रचंड मोठ्या उल्कापातामुळे पृथ्वीवरील डायनासोर्स नष्ट झाले होते हेदेखील अशाच एका अभ्यासातून पुढे आलं होतं. आता जर असा उल्कापात झाला तर जगातून माणूसच नष्ट होईल की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच वैज्ञानिक रात्रंदिवस अवकाशातील लघुग्रहांच्या (Astroid) प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. असाच एक लघुग्रह मार्च महिन्यात पृथ्वीजवळून जाणार आहे. नासा (Nasa) ने या लघुग्रहाचे नाव 138971 (2001 CB21) असं ठेवले आहे. या लघुग्रहापासून धोका असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. जर हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर सर्वनाश होऊ शकतो, अर्थात अशी शक्यता कमी आहे, असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. तरीही वैज्ञानिक त्यावर लक्ष ठेवून आहेत. या लघुग्रहाचा आकार जगातील सगळ्यांत उंच इमारत बुर्ज खलिफापेक्षाही प्रचंड मोठा आहे असं सांगितलं जात आहे. एखाद्या 72 मजली इमारतीपेक्षाही हा लघुग्रह मोठा आहे असं म्हणतात. रशियाने ISS खाली पाडण्याची दिलेली धमकी किती महत्वाची? अमेरिका झुकेल का? जाणून घ्या 5 पॉईंटमध्ये डेटाबेसच्या मदतीने नासाला हा लघुग्रह आढळला होता. 4 मार्च 22 रोजी सकाळी 7 वाजून 59 मिनिटांनी हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहे, अशी माहिती नासाने दिली आहे. हा लघुग्रह पृथ्वीपासून तीन मिलियन मैल दूर अंतरावरून जाईल अशी सध्यातरी माहिती आहे. पण जर त्याचा परिणाम पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर झाला तर मात्र पृथ्वीवरील जीवांसाठी ते मोठं संकट असू शकतं. सध्या तरी चंद्राच्या तुलनेत पृथ्वीपासून चार पट जास्त अंतरावरून हा लघुग्रह जाणार असल्याची माहिती आहे. जिथून हा ग्रह प्रवास करणार आहे ते पृथ्वीच्या कक्षेच्या बरेच बाहेर असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. अर्थात, याच्या आकाराबद्दल अजूनही संभ्रम आहे. इतका मोठा लघुग्रह आतापर्यंत कधीच पाहिला नसल्याचं काही वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. त्यामुळेच वैज्ञानिकांमध्ये याबद्दल गोंधळ निर्माण झालेला असू शकतो. याआधी फेब्रुवारी 2001 मध्ये वैज्ञानिकांनी उल्का पाहिली होती. तेव्हापासून त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आलं होतं. आता 4 मार्चला हा लघुघ्रह पृथ्वीच्या जवळून जाणार असल्याची माहिती आहे. अंतराळामध्ये घडणाऱ्या गोष्टींचा पृथ्वीवर परिणाम होत असतो. 4 मार्च रोजी घडणाऱ्या या घटनेचादेखील काहीतरी परिणाम नक्की होईल. फक्त तो पृथ्वीवासियांसाठी विनाशकारी नसावा इतकीच अपेक्षा आहे.