मुंबई, 10 डिसेंबर : तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशातील पहिले CDS जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर अनेक बातम्या समोर येत असून अपघाताबाबत अनेक गोष्टी सांगण्यात येत आहेत. अपघातापूर्वी हेलिकॉप्टर चालकाने आपत्कालीन सिग्नल जारी केला नाही, जो आपत्कालीन परिस्थितीत दिला जातो, असेही काही अहवालांमध्ये समोर आले आहे. हा मेडे कॉल Mayday काय आहे आणि तो कधी वापरला जातो? मेडे फक्त आणीबाणीच्या (Emergency) काळातच का वापरतात? एक प्रकारचा कॉल आहे, जो विमान किंवा जहाजातील कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षाला करतात. सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर जेव्हा एखादे विमान किंवा हेलिकॉप्टर आपल्या निर्धारीत ठिकाणी जात असेल आणि वाटेत एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवते, ज्यामुळे विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो, तेव्हा नियंत्रण कक्षाला या आपत्कालीन परिस्थितीबद्दल माहिती दिली जाते जेणेकरून वेळेत मदत पोहचवली जाईल. याला डिस्ट्रेस कॉल म्हणतात, जी आपत्कालीन परिस्थितीत पाठवलेली माहिती असते. हा कॉल विमान किंवा हेलिकॉप्टरमधील कर्मचारी पाठवतात. या कॉलमध्ये खास पद्धतीने Mayday बोलले जाते. मेडे एकामागून एक तंतोतंत तीन वेळा म्हटला जातो, जेणेकरुन जो ऐकत आहे त्याचा गैरसमज होऊ नये किंवा त्यातून दुसरा अर्थ काढू नये. हा शब्द मोठ्याने उच्चारला जातो. यानंतर जी काही अडचण किंवा समस्या भेडसावत आहे, त्याची माहिती दिली जाते.
या शब्दाची उत्पत्ती 1920 च्या सुमारास झाली. आता प्रश्न असा आहे की आणीबाणीच्या काळात पायलट फक्त मेडेच का बोलतो? वास्तविक, हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे. फ्रेंचमध्ये m’aider हा शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे मदत करा. फ्रेंचमध्ये मदत मागण्यासाठी m’aider वापर केला जातो आणि venez maider चा अर्थ आहे, की मदतीसाठी या. फ्रेंचनंतर अमेरिकेने आणीबाणीसाठी मेडेचा वापर केला जाऊ लागला. ते सलग तीन वेळा Mayday बोलायचे. पूर्वी एसओएस जास्त वापरला जात होता, याचा अर्थ save our souls आहे. आता SOS पेक्षा मेडे अधिक वापरला जातो. याशिवाय अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत पॅन-पॅनचा वापर केला जातो. यामध्ये पॅन हा फ्रेंच शब्द वापरला आहे, ज्याचा अर्थ ब्रेकडाउन आहे.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचं काम काय असतं? किती स्टाफ असतो आणि पगार किती? CDS चा कार्यकाळ 3 वर्षे किंवा 65 वयाच्या वर्षांपर्यंत असतो, यापैकी जे आधी असेल ते लागू होईल. जनरल रावत यांनी ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच हे पद निर्माण करण्यात आले होते. वयाच्या 62 व्या वर्षी ते लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाले आणि त्यानंतर ते सीडीएस झाले. ते 64 वर्षांचे होणार होते. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हा लष्कराचा सर्वोच्च अधिकारी असतो. ते 4 स्टार अधिकारी आहेत. तो ज्या सैन्याचा भाग आहे, तोच गणवेश परिधान करतो. त्याच्या चिन्हात, सैन्याच्या तीन भागांची चिन्हे अशोक चक्रासह सोन्याच्या धाग्याने बनविली जातात.