JOIN US
मराठी बातम्या / Explainer / Presidential Election 2022 : मुर्मू की सिन्हा? राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत कोण मारेल बाजी? शिवसेनेच्या भूमिकेने कसं बिघडलं गणित?

Presidential Election 2022 : मुर्मू की सिन्हा? राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत कोण मारेल बाजी? शिवसेनेच्या भूमिकेने कसं बिघडलं गणित?

India Presidential Election 2022: भारतात राष्ट्रपती थेट लोकांद्वारे निवडले जात नाहीत, तर लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी त्यांची निवड करतात. एनडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी आपापल्या बाजूने खासदार आणि आमदार करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 जुलै : शिवसेना पक्षाने राष्ट्रपती निवडणुकीसाठी नुकतीच आपली भूमिका जाहीर केली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (India Presidential Election 2022) आता आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. यानंतर 21 जुलै रोजी देशाच्या नव्या राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा केली जाईल. सर्वांच्या नजरा दोन प्रमुख उमेदवारांवर खिळल्या आहेत. एकीकडे एनडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आहेत तर दुसरीकडे विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा. दोन्ही उमेदवारांनी आपापल्या बाजूने खासदार व आमदार करण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. सध्यातरी द्रौपदी मुर्मू यांना कागदावर मोठा पाठींबा दिसत आहे. राष्ट्रपतीची निवडणूक ही पंतप्रधानांपेक्षा खूप वेगळी असते. इथे देशातील जनता थेट मतदान करत नाही. मतदानाचा अधिकार खासदार आणि आमदाराला आहे. प्रत्येक जागेवर मताचे मूल्य वेगळे असते. चला मतांचे गणित सविस्तरपणे समजून घेऊ आणि देशाचा पुढचा राष्ट्रपती कोण होऊ शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राष्ट्रपती निवडणुकीत किती मते? राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण खासदार आणि आमदारांची संख्या एकत्र करून मताचे मूल्य मोजले जाते. सध्या देशातील एकूण मतांचे मूल्य 1,086,431 आहे. यात एकूण 776 खासदारांचे मत आहे 543,200. तर देशातील एकूण 4,4033 आमदारांचे मत मूल्य – 543,231 आहे. बहुमताचा आकडा किती? राष्ट्रपती होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला 543,216 मतांची आवश्यकता असते. ताज्या राजकीय समीकरणावर नजर टाकली तर एनडीएकडे एकूण 533,751 मते आहेत. तर विरोधकांकडे 360,362 मते आहेत.

मोठी बातमी, उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर शरद पवार नाराज?

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील सत्ताबदलाने समीकरण बदलले आहे का? 21 जून रोजी 17-18 विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, आता महाराष्ट्रात सत्ताबदल होताच चित्र बदलले आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी आता भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे त्यांची मते द्रौपदी मुर्मूला जातील. दरम्यान, शिवसेनेच्या उर्वरित आमदारांनी उद्धव यांना मुर्मू यांना पाठिंबा देण्यास सांगितले. दुर्बल झालेल्या ठाकरेंकडे आमदारांचे म्हणणे ऐकण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. त्यामुळे आता ते मुर्मूला पाठिंबा देणार आहे. द्रौपदी मुर्मूला कोणत्या पक्षांनी पाठिंबा दिला? महाराष्ट्रातील सत्ता उलथून टाकल्यानंतर यशवंत सिन्हा यांची उमेदवारी थोडीशी कमकुवत झाली आहे. 18 जुलैच्या निवडणुकीसाठी भाजपने मुर्मू यांना उमेदवार म्हणून घोषित केले तेव्हा एनडीए बहुमताच्या आकड्यांपासून 13,000 मतांनी कमी होता. त्यानंतर त्यांना बसपा, एसएडी, वायएसआरसीपी, टीडीपी आणि बीजेडीचा पाठिंबा मिळाला. शिवसेनेकडे 10.86 लाख मतांपैकी 25 हजारांहून अधिक मते आहेत. यशवंत सिन्हा यांचा दावा किती भक्कम? यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत. मात्र, अनेक विरोधी पक्ष त्यांच्या समर्थनात नाहीत. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस त्यांच्या समर्थनात आहेत. मात्र, उर्वरित पक्ष काय करणार, याबाबत चित्र स्पष्ट नाही. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनही मुर्मू यांना मतदान करणार आहेत. याशिवाय आम आदमी पार्टीही यशवंत सिन्हा यांच्या विरोधात मतदान करू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या