मॉस्को, 25 फेब्रुवारी : युरोपियन युनियन (European Union) आणि अमेरिकेच्या (America) इशाऱ्यानंतरही रशियाने (Russia) युक्रेनवर (Ukraine) हल्ला केला. यावरुन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (president vladimir putin) यांना अमेरिकेच्या बदललेल्या सुरक्षा धोरणाचा आणि युरोपीय देशांतील परिस्थितीचा अंदाज आल्याचे दिसते. या युद्धात नाटोही युक्रेनच्या मदतीला येणार नाही, याचीही त्याला कल्पना होती असे दिसते. गेल्या 2-3 वर्षांपासून पुतीन युक्रेनला तीन बाजूंनी घेराव घालत होतेच, पण युक्रेनवर हल्ला करण्यासाठी कोणती वेळ योग्य असेल याचा अंदाजही घेत होते. अशा परिस्थितीत युक्रेनच्या मदतीला कोणीही धावून येणार नाही, याचा अंदाज रशियाला आधीच होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुतिन यांनी ही वेळ अत्यंत विचारपूर्वक निवडल्याचेही दिसते. काही महिन्यांपूर्वीच अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून परतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपल्या देशाच्या सुरक्षा धोरणात बदल केला आहे. जोपर्यंत आपले हितसंबंध धोक्यात येत नाहीत तोपर्यंत अमेरिका लष्करी कारवाईद्वारे प्रत्येक देशात हस्तक्षेप करणार नाही, असे दिसते. अमेरिका युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवणार नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान अमेरिकेने आपले लष्करी सल्लागार आणि युक्रेनला मदत करणाऱ्या लोकांना तेथून हटवले आहे. अमेरिकेत आता त्यांच्या देशाने बाहेरील कारभारात विनाकारण ढवळाढवळ करू नये, असा जनतेचा मोठा दबाव आहे. नाटो देशही हाच तमाशा पाहत आहेत युक्रेनच्या मुद्द्यावर बाहेरून केवळ तमाशा पाहण्याचे काम नाटो देशही करत आहेत. नाटो जर काही करत असेल, तर ते रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर असलेल्या त्यांच्या युतीच्या देशांमध्ये आपले सैन्य आणि शस्त्रे वाढवत आहे. युक्रेन अमेरिका आणि नाटो देशांमधील बळीचा बकरा झाला का? युरोपियन युनियन, नाटो आणि अमेरिका यांच्यात युक्रेन बळीचा बकरा बनल्याचे दिसते. अर्थात अमेरिका, युरोपियन युनियन आणि नाटो देशांनी रशियावर सर्व निर्बंध लादले असले तरी रशियाला त्याची पर्वा नाही असे दिसते. 2014 मध्ये क्रिमियाला रशियाने सक्तीने बळजबरी करून ताब्यात घेतले तेव्हा त्यावर सर्व निर्बंध लादले गेले पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. Russian Army | रशियाने 15 वर्षांत सर्वोत्तम लष्कर कसं उभारलं? निर्बंधांचा रशियावर काय परिणाम होईल? वस्तुस्थिती अशी आहे की या निर्बंधांच्या काळात तो केवळ मजबूत झाला नाही तर त्याची आर्थिक व्यवस्थाही पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली बनली आहे. आपल्या लष्करी आणि शस्त्रास्त्र क्षमतेच्या बळावर ते पुन्हा महासत्ता बनताना दिसत आहे.
रशिया-युक्रेन संबंध का बिघडले? युक्रेन आणि रशिया यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांपासून बिघडले आहेत. याचे कारण युक्रेनचा युरोपियन युनियन आणि नाटो देशांकडे झुकलेला कल होता. 2019 मध्ये, युक्रेनने आपल्या घटनेत सुधारणा करून, युरोपियन युनियन आणि NATO सोबत जाण्याचा मार्ग मोकळा केला. 2019 पासूनच रशिया करत होतं युक्रेनवर हल्ला करण्याची तयारी? धक्कादायक माहिती समोर त्यामुळे युक्रेनमध्येही गेल्या काही वर्षांत बरीच उलथापालथ झाली आहे. रशिया समर्थक राष्ट्राध्यक्षांना देश सोडून पळून जावे लागले. युक्रेनने मुक्त व्यापारासाठी युरोपियन युनियनशी करार केला. यामुळे रशिया खवळला. त्याला असे वाटू लागले की युक्रेन जर युरोपियन युनियन आणि नाटोमध्ये सामील झाला तर तो त्याच्या प्रभावापासून दूर जाईलच, पण नाटोमध्ये सामील होणे म्हणजे स्वतःसाठी धोक्याची घंटा होईल.
युक्रेनने नाटोमध्ये जावे असे रशियाला का वाटत नाही रशियाने नेहमीच नाटोला अमेरिकेनंतरचा सर्वात मोठा शत्रू मानला आहे. जर युक्रेन खरोखरच नाटोमध्ये सामील झाले असते, तर रशियाला अशा प्रकारे कारवाई करणे सोपे नव्हते. तेव्हा सर्व नाटो देश त्याच्या पाठीशी उभे राहिले असते. पण आता वास्तव हे आहे की युरोपियन युनियन आणि नाटोच्या जवळ जाण्यासाठी युक्रेनने रशियाशी संबंधात जी कटुता निर्माण केली आहे तीच त्याला धोका निर्माण झाली आहे. …म्हणून हजारो भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी निवडतात Ukraine देश; वाचा कारण युक्रेन एकटा पडलाय रशियाने हल्ला केल्यानंतर युरोपियन युनियनचे देश दुरूनच तमाशा पाहत आहेत. युक्रेनच्या खांद्याला खांदा लावून ते रशियाला टक्कर देतील, असे वाटते, असे कोणतेही विधान युरोपीय देश किंवा नाटोकडून आतापर्यंत आलेले नाही. रशियासोबतच्या लढाईत युक्रेन एकटा असल्याचे दिसते. पुतिन यांना याची कल्पना होती. यावेळी त्यांनी युक्रेनवर हल्ला केला, तर त्याचे काय नुकसान होणार आहे, याचे आकलन त्यांनी केले होते. युक्रेनवर हल्ला केला तर त्याला अमेरिका किंवा युरोपीय देशांसोबतच्या लष्करी संघर्षासारख्या संकटाला सामोरे जावे लागू शकते याची पूर्वकल्पना होती. सध्याच्या परिस्थितीत, हे स्पष्ट आहे की रशिया युक्रेनला सहजपणे आपल्या ताब्यात घेईल, त्यानंतर युक्रेनचे भविष्य काय असेल हे तो स्वतःच्या अटींवर ठरवेल.