न्यूयॉर्क, 18 जानेवारी : मृत्यूनंतरही (Death) जीवन शक्य आहे का? एखाद्या व्यक्तीला पुन्हा जिवंत केलं जाऊ शकते का? अशा प्रश्नांचा शोध फार पूर्वीपासूनच घेतला जात आहे. अद्यापतरी यात कोणाला यश आलेलं नाही. आधुनिक विज्ञानाच्या युगातही असे प्रयोग सुरुच आहेत. मात्र, अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वैज्ञानिक प्रक्रियेद्वारे मृतदेह सुरक्षित ठेवले जात असतील तर ते भविष्यातील वैद्यकीय प्रगतीच्या (Medical Advance) आधारे केले जात आहे. यासाठी क्रायोनिक्स (Cryonics) नावाचे तंत्रही अवलंबले जात आहे. अमेरिकेत (USA) लोक त्यांचे मृतदेह विशेष प्रयोगशाळेत सुरक्षित ठेवत आहेत. मानवी शरीराचे संरक्षण यामध्ये प्रगत तंत्रज्ञानाने माणसाचे जीवन परत येईपर्यंत मानवी शरीर बर्फासारखे गोठवून ठेवण्याची तरतूद आहे. अमेरिकेतील स्कॉट्सडेल येथील प्रयोगशाळेत मानवी शरीरे आणि त्यांचे अवयव जतन केले जात असून यासाठी ग्राहकही कमी नाहीत. याची एक प्रकारचा उद्योग म्हणून भरभराट होत आहे. तरी देखील हमी नाही या व्यवसायातील लोकांचा असा विश्वास आहे की भविष्यात लोक अशा प्रकारे पुनरुज्जीवन करू शकतील याची शाश्वती नाही. अशाप्रकारे मृतदेह जतन करण्याच्या प्रक्रियेकडे वैद्यकीय जगतात संशयाने पाहिले जात असून त्यावर टीका होत आहे. परंतु, क्रायोनिक्स स्वीकारणारे आणि मृत्यूनंतरच्या जीवनासाठी जोखीम पत्करण्यास तयार असलेल्यांमध्ये अनेक उच्च प्रोफाइल ग्राहक आहेत. किती असते तापमान? या प्रक्रियेत शास्त्रज्ञ मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर शरीराचे जतन करण्याचा प्रयत्न करतात. शरीरातील प्रत्येक पेशी जास्तीत जास्त जतन करण्याचा त्यांचा हेतू असतो. यासाठी ते शरीर किंवा जो भाग जतन करावा लागतो ते -196 अंश सेंटीग्रेडमध्ये गोठवून ठेवला जातो. कोविडने मरण पावलेल्या पारशींच्या धार्मिक अंत्यसंस्कारावर सुप्रीम कोर्टाचा आक्षेप विशेष द्रवपदार्थांचा वापर शास्त्रज्ञांचे उद्दिष्ट शरीरातील विघटन किंवा विखंडन प्रक्रिया शक्य तितक्या वेळ थांबवण्याचं आहे. यासाठी, त्याआधी शरीरात एक विशेष द्रव प्रसारित केला जातो, जो थंड होताना त्याचा विस्तार होतो आणि शरीरातील विघटन होण्याच्या प्रक्रिया चालू राहण्यापासून थांबवतो. या संपूर्ण प्रक्रियेला क्रायोप्रिझर्वेशन म्हणतात. ही एकमेव संधी आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे क्रायोनिक प्रक्रिया आताच नाही तर बराच काळ चालू आहे. क्रायोनिक पद्धतीने पहिले शरीर 1967 मध्ये जतन करण्यात आले होते. आज ही प्रक्रिया व्यवसाय आणि उद्योगाचे रूप धारण करत आहे. अल्कोर (ALCOR) कंपनीचे सीईओ मॅक्स मोरे म्हणतात, “आम्ही जे ऑफर करत आहोत ते परत येण्याची आणि शाश्वत जीवनाची संधी मिळण्याची फक्त एक संधी आहे, मग ती शंभर वर्षे असो किंवा हजार वर्षाचा असू शकते.
तंत्रज्ञानाच्या विकासाने काहीही शक्य? या तंत्रावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, विज्ञानाच्या जगात खूप अनपेक्षित यश मिळाले आहे. 100 वर्षांपूर्वी चंद्रावर जाण्याची चर्चा कल्पना वाटत होती, पण ते शक्य झाले. काही काळापूर्वी 1950 च्या दशकापर्यंत लोकांना मृत घोषित केले गेले होते, तेव्हा आपल्याला त्यांच्याशी काय करावे हे माहित नव्हते. आता सीपीआरच्या माध्यमातून त्यांना पुन्हा जिवंत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. Omicron नैसर्गिक लसीप्रमाणे काम करत असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा! काय आहे तथ्य? या प्रक्रियेसाठी केवळ संपूर्ण शरीर जतन केले जात नाही. उलट शरीराचे अवयव विशेषतः मेंदूचेही संरक्षण होते. याव्यतिरिक्त, भ्रूण किंवा मृत बाळ देखील संरक्षित केले जाते. अगदी मानवी शुक्राणू किंवा अंडी देखील संरक्षित आहेत. संपूर्ण शरीर जतन करण्यासाठी 2 लाख अमेरिकन डॉलर खर्च येतो, तर फक्त मेंदू जतन करण्यासाठी 80 हजार डॉलर्स खर्च येतो.