JOIN US
मराठी बातम्या / Explainer / आधी विकली गेलेली प्रॉपर्टी तुम्हाला विकण्यात आली? अशी मिळेल नुकसान भरपाई

आधी विकली गेलेली प्रॉपर्टी तुम्हाला विकण्यात आली? अशी मिळेल नुकसान भरपाई

यावेळी टायटल इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला मदत करू शकते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 सप्टेंबर : स्वमालकीचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी लोक फ्लॅट किंवा भूखंड खरेदी करतात. परंतु, जर आपण अशी प्रॉपर्टी (Property) खरेदी करताना त्याची सखोल माहिती घेतली नाही किंवा कागदपत्रांचा कायदेशीर दृष्टीनं अभ्यास केला नाही तर आपली फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. सामान्यतः आपण खरेदी करत असेलली प्रॉपर्टी या पूर्वी कोणा व्यक्तीला विकली गेलेली असते आणि याविषयी आपण अनभिज्ञ असतो. मात्र जेव्हा आपल्याला ही बाब कळते, तेव्हा नेमकं काय करावं हे आपल्याला माहिती नसतं. शहरांमध्ये असे प्रकार सामान्यतः घडतात. मात्र असं झाल्यास तुम्हाला पूर्ण नुकसान भरपाई (Compensation) मिळू शकते. मात्र यासाठी तुम्हाला जनरल इन्शुरन्स कंपनीकडून टायटल इन्शुरन्स पॉलिसी (Title Insurance Policy) घेणं आवश्यक असतं. जी प्रॉपर्टी तुम्ही खरेदी केली आहे, परंतु, त्या प्रॉपर्टीची विक्री संबंधित मालकानं यापूर्वीच दुसऱ्याला केली आहे, अशा परिस्थितीत त्या व्यक्तीनं तुमच्या घरावर किंवा प्रॉपर्टीवर हक्क सांगितला आणि हे प्रकरण न्यायालयात (Court) गेलं तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी केली आणि त्या जमिनीच्या मिळकतीसंदर्भात वाद असल्याचं तुम्हाला माहिती नाही. तसेच जी जमीन तुम्ही खरेदी केली आहे, तिची विक्री यापूर्वीच अन्य कोणाला झाली आहे, अशा स्थितीत कायदेशीर प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. अशा स्थितीत न्यायालयात तुमची बाजू कमजोर पडली, कागदपत्रं पूरक ठरली नाहीत आणि हातची जमीन जात असेल तर टायटल इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला मदत करू शकते. या पॉलिसीतून तुम्हाला जमीन व्यवहारात झालेलं अर्थिक नुकसान भरपाई स्वरुपात पुन्हा मिळू शकतं. टायटल इन्शुरन्स पॉलिसी ही इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट ऑथरिटी ऑफ इंडियानं (IRDA) आणली आहे. आयआरडीएच्या सल्ल्यानुसार, जे लोक घर किंवा जमीन खरेदी करत आहेत किंवा ते कोणत्याही प्रॉपर्टीचे मालक आहेत त्यांनी ही पॉलिसी घेणं गरजेचं आहे. या पॉलिसीचा कालावधी 12 वर्षांचा असतो. ज्या दिवशी तुम्हाला घराचं पझेशन मिळालं, त्या दिवसापासून 12 वर्षांपर्यंत ही पॉलिसी तुम्हाला संरक्षण देते. यात विम्याची (Policy) रक्कम ही खरेदीवेळी भरलेल्या रकमेइतकीच ठेवण्यात आली आहे. समजा तुम्ही 20 लाखांची प्रॉपर्टी खरेदी केली असेल तर टायटल इन्शुरन्स पॉलिसी 20 लाख रूपयांचीच असेल. डेव्हलपरसाठी ही पॉलिसी अनिवार्य आहे. मात्र प्रिमियम जास्त असल्यानं ती घेण्याकडं दुर्लक्ष केलं जातं. हे वाचा -  Explainer: काय आहे ‘वन नेशन-वन हेल्थ कार्ड’? अशाप्रकारे बनवता येईल हा महत्त्वाचा दस्तावेज जबरदस्तीनं घेतलेली जमीन किंवा अतिक्रमण असलेल्या प्लॉटवर घर बांधलं तर या पॉलिसी अंतर्गत संरक्षण मिळू शकत नाही. जर घर बांधताना तुम्ही पर्यावरणविषयक (Environment) नियमांचं उल्लंघन केलं असेल तर या पॉलिसीचा फायदा मिळू शकत नाही. घर खरेदी करताना संबंधित व्यक्तीनं मालमत्ता करासह (Property Tax) अनेक बाबींची माहिती घ्यावी त्यावर काही देय असल्याचा त्याचा समावेश या पॉलिसीत केला जात नाही. ही पॉलिसी आता सुरु होणार असून, कंपन्या आपल्या नियोजनानुसार विविध प्लॅन घेऊन येतील. भारतात मालकी हक्कासंदर्भात अनेक वाद होताना दिसतात, त्यामुळं ही पॉलिसी देशात नक्कीच दिलासा देणारी ठरणार आहे. खरेदी करण्यात आलेल्या प्रॉपर्टी किंवा जमीनीवर मालकी हक्कावरून काही वाद उद्भवल्यास संबंधित मालकाचं आर्थिक नुकसान होतं. मात्र टायटल इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून त्याला नुकसानभरपाई मिळू शकते. ज्याप्रमाणे आग, पूर आदी नैसर्गिक आपत्तीत आपल्या संरक्षण मिळावं यासाठी आपण पॉलिसी खरेदी करतो, त्याच प्रमाणे ही पॉलिसी मालकी हक्क वादाशी संबंधित जोखमीपासून आपल्याला संरक्षण देते. आधीच खरेदी केलेल्या जमीनालाही या पॉलिसीतून संरक्षण मिळते. समजा 20 वर्षांपूर्वी तुम्ही एखादी जमीन खरेदी केली असेल, परंतु, टायटल इन्शुरन्स पॉलिसी आता घेतली असले तर जमीन खरेदीच्या दिवसापासून तुम्हाला मालकी हक्काबाबत संरक्षण मिळेल. त्यामुळं तुम्ही टायटल इन्शुरन्स पॉलिसी कधी घेतली यानं काही फारसा फरक पडत नाही. काही प्रकरणांमध्ये काही वर्षांनंतर मालकी हक्कासंदर्भात वाद उदभवतात, त्यामुळे या पॉलिसीच्याबाबत असा नियम तयार करण्यात आला आहे. हे वाचा -  E-Vehicle चालवताना खरंच शॉक बसतो? बॅटरी सेव्हिंगसह जाणून घ्या महत्त्वाच्या Tips या पॉलिसीमुळं केवळ लहान खरेदीदारांनाच नाही तर मोठ्या फायनान्सर आणि बिल्डर्सला फायदा होईल. कारण फायनान्सर आणि बिल्डर्सचीही फसवणूक होण्याची शक्यता असते. अनेकदा ही मंडळी मोठा प्लॉट खरेदी करतात आणि नंतर मालकी हक्कावरून वाद निर्माण होतात. यात दोन गोष्टी होतात. एक म्हणजे ज्यानं जमीन घेतली आहे, त्याच्याबाजूनं फर्मान असेल आणि जमीन त्याच्या नावावर असेल. जर मालक न्यायालयात दावा हरला तर त्याला टायटल पॉलिसीतून भरपाई मिळेल. अशा पद्धतीनं टायटल इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून प्रॉपर्टीच्या मालकी हक्काच्या वादात नुकसान झाल्यास संबंधित व्यक्तीला संरक्षण आणि पर्यायानं नुकसानभरपाईही मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या