JOIN US
मराठी बातम्या / Explainer / कोण आहे नूपुर शर्मा? ज्यांच्यामुळे जगभरात उडालीय खळबळ! बलात्कार, जीवे मारण्याच्या येतायेत धमक्या

कोण आहे नूपुर शर्मा? ज्यांच्यामुळे जगभरात उडालीय खळबळ! बलात्कार, जीवे मारण्याच्या येतायेत धमक्या

भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे. नुपूर शर्मांवर प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे. नुपूर शर्मा यांना आता इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 5 जून : भाजपने अखेर प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित (Nupur Sharma Suspended) केले आहे. प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केल्याप्रकरणी नुपूरला पक्षाने निलंबित केले आहे. भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने नुपूर शर्मा यांच्या निलंबनाचे पत्रही जारी केले आहे. यासोबतच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनीही पक्ष सर्व धर्मांचा आदर करत असल्याचे पत्र जारी केले आहे. कोण आहे नूपुर शर्मा? नुपूर शर्मा यांचा जन्म 23 एप्रिल 1985 रोजी नवी दिल्लीत झाला. त्यांनी दिल्ली पब्लिक स्कूल (DPS) मधून शिक्षण घेतले आहे. याशिवाय त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून अर्थशास्त्र (ऑनर्स) ही पदवी घेतली आहे. नूपुर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एलएलएमही केले आहे. नुपूर शर्मा कॉलेजपासून राजकारणात सक्रिय आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) तिकिटावर त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (डीयूएसयू) अध्यक्षही झाल्या आहेत. 2015 मध्ये नुपूर शर्मा यांना भाजपच्या प्रवक्त्या बनवण्यात आले होते. नुपूर शर्मांवर पैगंबराचा अपमान केल्याचा आरोप 27 मे रोजी ज्ञानवापी विषयावरील एका टीव्ही चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात काही अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप आहे. चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी आरोप केला की, काही लोक हिंदू धर्माची खिल्ली उडवत आहेत. यानंतर नुपूर शर्मा यांनी इस्लामिक श्रद्धांचा उल्लेख केला. यावर मोहम्मद जुबेर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर नुपूरची व्हिडिओ क्लिप शेअर करून पैगंबरांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. नुपूर शर्मांना जीवे मारण्याच्या धमक्या तेव्हापासून तिला मुस्लिम कट्टरतावाद्यांकडून सतत बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. नुपूरविरोधात अनेक शहरांमध्ये एफआयआरही दाखल करण्यात आले आहेत. नुपूर म्हणते की मला भीती वाटते की इस्लामिक कट्टरपंथी माझ्या कुटुंबाला आणि माझे नुकसान करू शकतात. असे काही झाले तर त्याला मोहम्मद जुबेर जबाबदार असेल.

वाचाळगिरी भोवली, अखेर भाजपने केले नुपुर शर्मांना निलंबित

संबंधित बातम्या

एडीटेड व्हिडिओ व्हायरल : नुपूर शर्मा नुपूर शर्मा यांचे म्हणणे आहे, की व्हायरल व्हिडिओ एडीटेड केलेला आहे, जो फॅक्ट चेकरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यापासून त्यांना इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून धमक्या येत आहेत. नुपूर शर्माने आरोप केला आहे की Alt न्यूजच्या मालकाने तिच्याविरुद्ध ट्रोल्सला प्रोत्साहन देण्यासाठी संपादित व्हिडिओ पोस्ट केला आहे. दरम्यान, त्यांनी संरक्षणाची मागणी केली आहे. दुसरीकडे, ऑल्ट न्यूजचे प्रोप्रायटर मोहम्मद जुबेर म्हणतात की, मी व्हिडिओमध्ये कोणतेही एडिटिंग केलेले नाही, जे होते ते मी पोस्ट केले आहे. या वादाची तीन मिनिटांची रेकॉर्ड क्लिप ट्विटरवर शेअर करण्यात आली आहे. नुपूर शर्मा यांचेही नाव देण्यात आलेले नाही. मी लिहिलं होतं की अशा कमेंट थांबवायला हव्यात. मला देखील धमक्या येत आहेत. नुकतेच एका टीव्ही वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेदरम्यान भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केले होते, त्यामुळे अल्पसंख्याक समाजातील लोक संतापले आहेत. कानपूरमध्ये मिरवणुकीत हिंसाचार उसळला दरम्यान, नूपूर शर्मांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत शुक्रवारी कानपूरमध्ये रॅली काढण्यात आली होती. दुकाने बंद करण्याच्या प्रयत्नात दोन समाजाचे लोक एकमेकांना भिडले. एकमेकांवर दगडफेक आणि बॉम्ब फेकल्यानंतर काही भागात हिंसाचार उसळला. या चकमकींमध्ये अनेक जण जखमी झाले असून अर्धा डझनहून अधिक गंभीर जखमी झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या