Sunflower
**मुंबई, 10 नोव्हेंबर :**जिकडे सूर्य तिकडे सूर्यफुलाचं तोंड, हे ऐकायला, वाचायला खूप इंटरेस्टिंग आहे. पण या मागचं कारण किती जणांना माहीत आहे? टवटवीत पिवळ्या रंगाचं सूर्यफूल सूर्याच्या दिशेला का तोंड करतं? तुम्ही कधी याबाबत विचार केला आहे का? कारण जगातील सर्वांत सुंदर फुलांपैकी एक असणारं सूर्यफूल हे केवळ याच कारणामुळे अनेकांसाठी आकर्षणाचं कारण राहिलं आहे. तुम्हाला विविध प्रकारची फुल माहिती असतील. त्यातही सूर्यफूल माहिती नसेल, अशी व्यक्ती तर सहसा सापडणार नाही. कारण या फुलाचं वैशिष्ट्यच एवढं खास आहे की, जे प्रत्येकालाच विचार करण्यास भाग पाडतं. अर्थात, सायन्स ‘सूर्यफूल’ हे फुलांच्या श्रेणीत धरत नाही. पण सूर्यफुलाच सौंदर्य नाकारून चालणार नाही. बऱ्याचदा या फुलाच्या नावावरून एक प्रश्न अनेकांना पडतो, तो म्हणजे सूर्यफुलाच तोंड हे नेहमी सूर्याकडे का असते? चला तर आज आम्ही तुम्हाला याबाबतच माहिती देणार आहोत. सूर्यफुलाचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे, ते नेहमी त्याच बाजूला तोंड करतं ज्या बाजूला सूर्य असतो. हे जगातील एकमेव फूल आहे, जे दिवसभरात अनेक वेळा आपली दिशा बदलतं. दिवसाच्या सुरुवातीला या फुलाचं तोंड हे पूर्वेकडे असतं, आणि दिवसाच्या शेवटी ते पश्चिमेकडे पोहोचतं. हेही वाचा - Vastu Tips : घरात कायम नांदेल सकारात्मक ऊर्जा, फक्त फरशी पुसताना वापरा या दोन वस्तू सूर्यफुलाचा सूर्याशी हा आहे संबंध सूर्यफुलाचा सूर्याशी संबंध जोडला जातो. कारण उन्हाळ्यात आकाशात सूर्य तळपत असताना, ही फुलं जास्त टवटवीत असतात, आणि हिवाळ्यात ती फार सक्रिय राहत नाही. जिथे जास्त सूर्यप्रकाश असतो, तिथे सूर्यफुलाचं पीक चांगलं येतं. विशेष म्हणजे, सूर्यास्तावेळी सूर्यफुलाचं तोंडही सूर्यासोबत पश्चिमेकडे असतं, आणि सकाळी पुन्हा सूर्य उगवताना या फुलाचे तोंड पूर्वेकडे असतं. संशोधनानुसार सूर्यफुलं रात्री विश्रांती घेतात, आणि सूर्यप्रकाश येताच पुन्हा सक्रिय होतात.
म्हणून सूर्यफुलाच तोंड असतं सूर्याकडे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. केटे उत्तम सांगतात की, ‘सूर्यफुलाचं तोंड हे सूर्याकडे असतं, त्यामागील कारण हेलिओ ट्रॉपिझम आहे. माणसांप्रमाणेच, फुलांमध्येही एक बायोलॉजिकल क्लॉक असतं, जे सूर्यकिरण ओळखतं, आणि फुलांना त्या दिशेनं वळण्यास प्रवृत्त करतं. त्यामुळेच दिवसभर सूर्यफुलाच तोंड हे सूर्याकडे राहतं.’ सूर्यफुलाचं हे वैशिष्ट्य मात्र प्रत्येकासाठी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. या फुलाला औषधी महत्त्व असून, त्याची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळेच या फुलाची शेती करण्यास बहुतांश शेतकरी प्राधान्य देत असतात.