JOIN US
मराठी बातम्या / Explainer / लादेनच्या मृत्यूनंतरही अलकायदा तितकीच डेंजर! भारताला धमकावणाऱ्या संघटनेचा म्होरक्या आहे 70 वर्षीय डॉक्टर

लादेनच्या मृत्यूनंतरही अलकायदा तितकीच डेंजर! भारताला धमकावणाऱ्या संघटनेचा म्होरक्या आहे 70 वर्षीय डॉक्टर

दहशतवादी संघटना अल कायदाने (Al-qaeda Threatening India) दिल्ली, मुंबई, यूपी आणि गुजरातमध्ये आत्मघाती हल्ल्याची धमकी दिली आहे. आमच्या पैगंबराचा अपमान करणाऱ्यांना आम्ही मारून टाकू, असे या दहशतवादी संघटनेने म्हटले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 जून : भाजप नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर दहशतवादी संघटना अल कायदाच्या दक्षिण आशिया विभागाशी संलग्न असलेल्या AQIS ने भारतात आत्मघाती हल्ल्याची धमकी दिली आहे. AQIS ने 6 जून रोजी जारी केलेल्या पत्रात प्रेषित मुहम्मद यांच्या अपमानाचा बदला घेण्याची धमकी देत ​​दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आत्मघाती हल्ले करण्याची धमकी दिली होती. अल कायदा ही तीच संघटना आहे, ज्याने अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला होता. त्याचा प्रमुख ओसामा बिन लादेन एकेकाळी जगभरात दहशतीसाठी कुप्रसिद्ध होता. अल कायदा म्हणजे काय? अल कायदा ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे. त्याची स्थापना 1988 मध्ये ओसामा बिन लादेन आणि अब्दुल्ला आझम या दहशतवाद्यांनी केली होती. सोव्हिएत सैनिकांनी अफगाणिस्तानात प्रवेश केल्यावर ही संघटना निर्माण झाली होती असे म्हणतात. या संघटनेला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO), युरोपियन युनियन, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, युनायटेड किंगडम, भारत, रशिया आणि अनेक देशांनी दहशतवादी गट म्हणून घोषित केले आहे. कोण होता ओसामा बिन लादेन? अल-कायदाची सुरुवात ओसामा-बिन-लादेनने केली होती. याचा जन्म 10 मार्च 1957 रोजी सौदी अरेबियातील रियाध शहरात झाला. ओसामाचे वडील मोहम्मद अवद बिन लादेन हे एक श्रीमंत बांधकाम व्यावसायिक होते. अवाद बिन लादेनला 52 मुले होती आणि ओसामा 17 व्या क्रमांकावर होता. 1968 मध्ये वडिलांचे निधन झाले. ओसामा तेव्हा 11 वर्षांचा होता आणि त्याच्याकडे 8 कोटी डॉलर्सची रक्कम होती. त्या काळात तो शाळेत शिकत होता. नंतर त्याने सौदी अरेबियाच्या किंग अब्दुल्ला अझीझ विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. हवामान बदलाच्या लढाईत झाडांवरील संशोधनाने शास्त्रज्ञांना धक्का! बिन लादेन दहशतवादी कसा बनला? अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना ओसामा बिन लादेन कट्टर इस्लामिक शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संपर्कात आला. त्यानंतर मुजाहिदीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लढवय्यांना मदत करण्यासाठी तो 1979 मध्ये अफगाणिस्तानला गेला. बिन लादेन एका गटाचा मुख्य आर्थिक पाठीराखा बनला जो नंतर अल-कायदा बनला. 1989 मध्ये सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर लादेन त्याच्या बांधकाम कंपनीत काम करण्यासाठी सौदी अरेबियात परतला. येथे त्याने अफगाण युद्धात मदत करण्यासाठी निधी उभारण्यास सुरुवात केली. येथूनच अल कायदा हा जागतिक गट बनला. त्याचे सदस्य 35 ते 60 देश होते. 1991 मध्ये, जेव्हा अमेरिकन सैन्याने इराकी सैन्याला कुवेतमधून बाहेर काढण्यासाठी युद्ध सुरू केले तेव्हा बिन लादेनने अमेरिकन सैन्याविरुद्ध मोहीम सुरू केली. त्यानंतर त्याला सौदी अरेबियातून हाकलण्यात आले. सौदी अरेबियाने त्याचे आणि त्यांच्या कुटुंबाचे नागरिकत्व परत घेतले. त्यानंतर त्याने सुदानमध्ये आश्रय घेतला. एकापाठोपाठ एक दहशतवादी हल्ले 1993 मध्ये ओसामा बिन लादेनच्या दहशतवाद्यांनी पहिल्यांदा वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला होता. यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो जखमी झाले. या प्रकरणात सहा मुस्लिम कट्टरतावाद्यांना दोषी ठरवण्यात आले होते. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये रियाधमध्ये एका इमारतीसमोर बॉम्बस्फोट झाला होता. या इमारतीत अमेरिकन सैन्याशी संबंधित लोक काम करायचे. या हल्ल्यात पाच अमेरिकन आणि दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात 60 हून अधिक लोक जखमी झाले. राष्ट्रपतीपदाची निवडणूक : यावेळी खासदारांचे मतमूल्य कमी होण्याचं कारण काय? अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला 1995 मध्ये, नैरोबी आणि टांझानिया येथील दार एस सलाममध्ये अमेरिकन दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट झाले. यामध्ये 224 जणांचा मृत्यू झाला होता. 1996 मध्ये सुदानने अमेरिकेच्या दबावाखाली लादेनला हाकलून लावले. यानंतर लादेन आपल्या 10 मुले आणि तीन पत्नींसह अफगाणिस्तानला पोहोचला. येथे त्याने अमेरिकन सैन्याविरुद्ध जिहाद घोषित केला. 20 ऑगस्ट 1998 रोजी दूतावासावरील हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तान आणि सुदानमधील लादेनच्या प्रशिक्षण शिबिरांवर हल्ले केले. यामध्ये 20 दहशतवादी मारले गेले. मात्र, लादेन निघून गेला होता. जगातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला 2001 मध्ये अल-कायदाने जगातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला होता. 11 सप्टेंबर रोजी दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉनच्या ट्विन टॉवर्सवर हल्ला केला होता. यामध्ये तीन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर अमेरिकेने ओसामा बिन लादेनचा झपाट्याने शोध सुरू केला. अमेरिकेने त्याला अफगाणिस्तानच्या कानाकोपऱ्यात शोधले, पण तो सापडला नाही. अमेरिकेपासून लपून बसलेल्या ओसामाने याच दरम्यान अनेक ऑडिओ टेप्स प्रसिद्ध करून जगभरातील मुस्लिमांना जिहाद करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली. नुपूर शर्मांचं वक्तव्य ते नमाजनंतर दगडफेक! या घटनांच्या मुळाशी नेमकं कोण? ओसामा मारला गेला 2 मे 2011 रोजी अखेर अमेरिकेला मोठे यश मिळाले. ओसामा पाकिस्तानात लपला असल्याची माहिती अमेरिकेला मिळाली. त्यानंतर अमेरिकेच्या वेगवान सैन्याने इस्लामाबादजवळील अबोटाबाद येथे केलेल्या कारवाईत ओसामाचा खात्मा केला. आता अल कायदाचा प्रमुख कोण? ओसामा बिन लादेनच्या हत्येनंतर अयमान अल-जवाहिरीने अल-कायदा प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली. अयमान अल-जवाहिरी 70 वर्षांचा आहे. ओसामाच्या मृत्यूनंतर भारत, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये दहशतवादी हल्लेही केले. त्याचा जन्म 1951 मध्ये गिझा येथे झाला. जवाहरी याने वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. सध्या जगभरातील अनेक एजन्सी त्याचा शोध घेत आहेत. अल कायदाला सध्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक, कुवेत या देशांकडून निधी मिळतो, असे म्हटले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या