JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Actress Amruta Pawar : 'आधी मला फार भीती वाटत होती...'; अभिनेत्री अमृता पवारचा लग्नाबाबत मोठा खुलासा

Actress Amruta Pawar : 'आधी मला फार भीती वाटत होती...'; अभिनेत्री अमृता पवारचा लग्नाबाबत मोठा खुलासा

अमृताने आपल्या बरेच वर्ष बॉयफ्रेंड असलेल्या नीलसोबत विवाहगाठ बांधली आहे अशा चर्चा होत्या. मात्र आता अमृताने स्वतः ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नामागची गोष्ट सांगत मोठा खुलासा केला आहे.

जाहिरात

Actress Amruta pawar

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जुलै: झी मराठीच्या ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेतील अदिती म्हणजेच अभिनेत्री अमृता पवार काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली आहे. लग्नानंतर ती प्रचंड खुश दिसत आहे. अमृताने आपल्या बरेच वर्ष बॉयफ्रेंड असलेल्या नीलबरोबर विवाहगाठ बांधली आहे अशा चर्चा होत्या. मात्र आता अमृताने स्वतः ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नामागची गोष्ट सांगत मोठा खुलासा केला आहे. ( amruta pawar revels story of her marriage) अमृता पवार आणि निल पाटील यांचं अरेंज मॅरेज झालं आहे. अमृताने मुलाखतीदरम्यान सांगितलं कि, ‘मला कधीच वाटलं नव्हतं कि मी अरेंज मॅरेज करेन. पण एका मॅट्रिमोनिअल साईटवरून निल आणि मी भेटलो. आणि त्यानंतर सहा महिन्यातच आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.’ या मुलाखतीदरम्यान अमृता पुढे म्हणाली कि, तिला लग्नाच्या आधी  भीती वाटत होती. पुढे ती त्याचे स्पष्टीकरण देत म्हणाली कि,  ‘मला नील  पहिल्या भेटीतच आवडला होता. पण त्याच आणि माझं करिअर पूर्णपणे वेगळं आहे. त्यामुळे मला माझे सासरकडचे लोक माझ्या करिअर सहित एक अभिनेत्री म्हणून मला स्वीकारतील कि नाही याची भीती वाटत होती. पण त्यांनी मला माझ्या करिअरसाठी पूर्ण पाठींबा दर्शवला. माझ्या सासू सासऱ्यांना आनंद वाटतो कि मी मराठी मालिकांमध्ये काम करते आणि इतरांनाही ते हि गोष्ट अभिमानाने सांगतात.’ हेही वाचा -  Man Udu Udu Jhala: अखेर देशपांडे सरांनी स्वीकारलं इंद्रा दीपूचं नातं! थाटात लावून देणार लेकीचं लग्न लग्नानंतरच्या प्रवासाबद्दल बोलताना अमृता म्हणाली कि, माझं आयुष्य नव्याने सुरु होणार आहे आणि मी एका पूर्णपणे नवीन घरात जाणार आहे  त्याबाबतीत मी आनंदी आहे. पण माझ्या आई बाबांना मी मिस करेन. मी आता शुटिंगवरून घरी आल्यावर मला आई बाबा समोर दिसणार नाहीत. त्यांना मी मिस करते.  अशा शब्दात अमृताने  तिच्या भावना व्यक्त केल्या. बायोमेडिकल इंजिनिअर असलेल्या निल पाटीलबरोबर अमृता पवारने लग्न केलं आहे. नीलबाबत विचारलं असता अमृता म्हणाली कि, ‘नील खूपच साधा आणि संवेदनशील व्यक्ती आहे. तो त्याच्या घरच्यांचा खूप आदर करतो, त्यांच्यावर प्रेम करतो. मलाही अगदी नेहमी असाच जोडीदार हवा होता आणि नीलच्या रूपात मला तो भेटला आहे. दरम्यान अमृताने लग्नासाठी ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेतून छोटासा ब्रेक घेतला होता आणि ती लवकरच पुन्हा शूटिंगसाठी परतणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या