new marathi serial
मुंबई, 31 ऑगस्ट : टीआरपीच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी वाहिन्या नवनवीन प्रयोग करताना दिसतात. झी मराठीवर असाच एक आहे. झी मराठी वाहिनीवर लागोपाठ नवीन मालिका दाखल होत आहेत. जुन्या मालिकांना काही केल्या टीआरपी मिळत नाहीये. टीआरपीच्या शर्यतीती झी मराठीच्या मालिका खूप मागे आहेत. त्यामुळे जुन्या मालिका संपवून नवीन मालिका सुरु करण्याचा ट्रेंड सध्या झी मराठीवर दिसत आहे. मध्यंतरी तू चाल पुढं, अप्पी आमची कलेक्टर या मालिका सुरु झाल्या आहेत तसेच येणाऱ्या काळात सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका सुरु होणार आहे. आता पुन्हा एकदा नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे आता झी मराठीवरील अतिशय लोकप्रिय मालिका संपणार असल्याची शक्यता आहे. झी मराठीवर येत्या 19 सप्टेंबर पासून ‘दार उघड बये’ हि नवीन मालिका सुरु होणार आहे. या मालिकेमध्ये शरद पोंक्षे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. शरद पोंक्षे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून या मालिकेचा प्रोमो रिलीज केला आहे. ही मालिका स्त्री केंद्रित असल्याचं दिसत आहे. ‘दार उघड बये’ ही मालिका झी बांग्ला वरील ‘जमुना धाकी’ या मालिकेचा रिमेक असल्याची माहिती समोर येत आहे. हेही वाचा - Sneha Wagh : ‘इथे येणं माझ्या नशिबात लिहिलं होतं’; असं का म्हणतेय स्नेहा वाघ? शरद पोंक्षेंसोबत या मालिकेत नवीन चेहरे दिसून येत आहेत. येत्या 19 सप्टेंबर पासून ‘दार उघड बये’ झी मराठीवर 8:30 वाजता सुरु होणार आहे. झी मराठीवर सध्या या वेळेत माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका असते. त्यामुळे आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. शरद पोंक्षे सध्या स्टार प्रवाहावरील ‘ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत महत्वाची भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे ते या मालिकेतून एक्झिट घेणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
मागच्या काही दिवसांपासून माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत सतत तेच तेच घडत असल्याने मालिका सतत सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. त्यामुळे मालिका खरचं निरोप घेणार का असा देखील प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मात्र मालिकेच्या निर्मात्यांकडून याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र आता हि नवीन सुरु होणारी मालिका प्रेक्षकांना आकर्षित करून झी मराठीचा टीआरपी वाढेल का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.