JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेत्री Yami Gautam केराटोसिस-पिलेरिस आजाराने ग्रस्त; पोस्ट शेअर करत सांगितली स्थिती

अभिनेत्री Yami Gautam केराटोसिस-पिलेरिस आजाराने ग्रस्त; पोस्ट शेअर करत सांगितली स्थिती

यामी गौतम (Yami Gautam) बॉलिवूडमधील (Bollywood) एक उत्तम आणि तितकीच सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5ऑक्टोबर- यामी गौतम (Yami Gautam) बॉलिवूडमधील (Bollywood) एक उत्तम आणि तितकीच सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.नुकताच ‘भूत पुलिस’ चित्रपटातून आपल्या समोर आलेल्या यामीच्या सौंदर्यावर अनेक लोक फिदा आहेत. मात्र यामी काही काळापासून एका त्वचेच्या आजाराशी पीडित आहे. अभिनेत्री नुकताच याबद्दलचा खुलासा केला आहे.

संबंधित बातम्या

अभिनेत्री यामी गौतमने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट लिहीत याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली आहे. यमीने आपल्या इन्स्टाग्रामवर आपली न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. तसेच पोस्ट लिहीत म्हटलं आहे, ‘मी केराटोसिस-पिलारिस या त्वचेच्या आजाराने ग्रस्त आहे. शालेय वयापासून मला हा आजार जडला आहे. यामध्ये तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्या उदभवतात. जसे की मला चेहऱ्यावर रुक्ष चट्टे उठणे, बारीक दाने उठणे, चेहऱ्यावर उंचवटे निर्माण होणे असे प्रकार दिसून येतात. हे मला शालेय वयापासून जडलं आहे. मात्र यावर आजही कोणताच उपाय मिळाला नाहीय’. (**हे वाचा:** Ranveer Singh बनला NBA चा ब्रँड अँबॅसिडर; बालपणापासूनच आहे बास्केटबॉलवर प्रेम ) यामी गौतमने पुढं लिहिलं आहे, ‘मी नुकताच काही प्रोजेक्ट्ससाठी फोटोशूट केलं आहे. यावेळी माझ्या चेहऱ्यावर उदभवलेली केराटोसिस-पिलारिस समस्या लपवण्यासाठी फोटो एका प्रक्रियेमध्ये जाणार होते. मात्र यावेळी मी स्वतःशीच म्हटलं. अरे यामी तू हे सत्य का स्वीकार करत नाहीस. त्या आजाराला फेस करण्यासाठी आणि त्यातून बरं होण्यासाठी आधी तू याचा स्वीकार कर. आणि हो ते तुमच्या मनाइतके वाईट अजिबात नसतात. ज्यांना आजाराबद्दल माहिती नाही त्यांना सांगू इच्छिते केराटोसिस-पिलारिस म्हणजे तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्या उदभवतात. जसे की चेहऱ्यावर रुक्ष चट्टे उठणे, बारीक दाने उठणे, चेहऱ्यावर उंचवटे निर्माण होणे तसेच हे प्रकार हात, मान आणि चेहेऱ्याच्या वरच्या भागावर दिसून येतात’. मला शालेय वयापासून हा आजार जडला आहे. मी तेव्हापासून हे सहन करत आहे. मात्र यावर अजूनही मला कोणताच उपाय सापडला नाहीय. **(हे वाचा:** इरफान खानच्या आठवणीत पुन्हा भावुक झाला मुलगा बाबिल; शेअर केला थ्रोबॅक PHOTO ) अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी आता बऱ्याच वर्षांपासून याचा सामना केला आणि आज शेवटी, मी माझी सर्व भीती आणि असुरक्षितता सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि माझा ‘ दोष ’मनापासून स्वीकारण्याचे धैर्य शोधले. मला माझे सत्य तुमच्याशी शेअर करण्याचे धाडसही सापडले. ओह! मला माझे फॉलिक्युलायटीस एअरब्रश करणे किंवा डोळ्याखालील ‘गुळगुळीत करणे’ किंवा कंबर थोडी अधिक ‘आकार देणे’ असे वाटले नाही! आणि तरीही, मला मी सुंदर वाटते ”अशी लांबलचक पोस्ट शेअर करत यामीने सर्वांचं मन जिंकलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या