JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी अडकणार लग्नबंधनात?, अभिनेत्रीने केला खुलासा

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी अडकणार लग्नबंधनात?, अभिनेत्रीने केला खुलासा

अभिनेत्री रकुल प्रीतसिंग आणि अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांच्याही लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.

जाहिरात

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 ऑक्टोबर :  बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघंही 2023 मध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याच चर्चांवर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. रकुल आणि जॅकी मागच्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि एकमेकांवर असलेल्या प्रेमाबद्दल उघडपणाने बोलत असतात. E Times च्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की रकुल आणि जॅकीने त्यांच्या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याचा म्हणजेच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. “लग्न 2023 मध्ये होईल आणि ही बातमी खरी आहे. दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि त्यांचा लग्नावर विश्वास आहे, त्यामुळे ते लग्न करणार आहेत," अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं E Timesने दिली आहे. त्याच रिपोर्टमध्ये, रकुलच्या भावाने दोघांच्या लग्नाच्या बातमीला दुजोरा दिला असून, रकुल आणि जॅकी दोघेही सध्या आपापल्या कामात व्यग्र असल्याचं म्हटलंय. हेही वाचा -  रणवीर बनला नीरज चोप्राचा टीचर; या गोष्टीचे देतोय धडे, पाहा VIDEO “रकुलने जॅकी भगनानीच्या दोन प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. दोघांचं लग्न नक्की होणार आहे, पण अजून काही ठरलेलं नाही. त्यामुळे जेव्हा ती लग्न करण्याचा निर्णय घेईल तेव्हा ती स्वतःच याबद्दल घोषणा करेल,” असं रकुल प्रीतचा भाऊ अमनने सांगितलं. दरम्यान, भाऊ अमनचा हा दावा अभिनेत्रीने फेटाळून लावला आहे. याबाबत तिने ट्विटरवर खुलासा केला आहे. रकुलने ट्विट केलं, “अमन तू लग्नाच्या बातमीची पुष्टी केलीस?आणि मला सांगितलं पण नाहीस, माझ्या आयुष्याबद्दलची बातमी मलाच माहिती नाही, हे किती मजेदार आहे…” असं कॅप्शन तिने लग्नाची बातमी टॅग करत लिहिलंय.

संबंधित बातम्या

गेल्या वर्षी रकुल प्रीत सिंहच्या वाढदिवशी जॅकी भगनानीने इन्स्टाग्रामवर तिच्यासाठी एक नोट लिहिली होती आणि फोटोही शेअर केला होता. त्या पोस्टवरून त्यांनी त्यांचं नातं अधिकृतपणे लोकांसमोर मान्य केलं असं मानलं गेलं. जॅकीने दोघांनी एकमेकांचा हात हातात धरलेला एक सुंदर फोटो शेअर केला होता आणि त्याला कॅप्शन दिलं होतं, “तुझ्याशिवाय दिवस काही दिवसांसारखे वाटत नाहीत. तुझ्याशिवाय सर्वांत स्वादिष्ट पदार्थ खाण्यात मजा नाही. माझ्यासाठी जग असलेल्या या सर्वात सुंदर आत्म्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!! तुझा दिवस तुझ्या स्मितहास्यासारखा आणि तुझ्यासारखाच सुंदर जावो.”

जॅकीच्या या पोस्टने नात्याची कबुली दिली. त्यानंतर ते एकमेकांबद्दल बऱ्याचदा बोलताना दिसतात. दोघांच्या लग्नाच्या चर्चाही सुरू आहेत, पण रकुलच्या ट्विटनंतर ती आणि जॅकी इतक्यात लग्न करणार नसल्याचं दिसतंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या