विद्या बालनचं मराठी प्रेम; शेअर केलं धम्माल रील!
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
तिने कहाणी, जलसा तसेच डर्टी पिक्चर या चित्रपटाद्वारे ती कोणत्याही भूमिकेत सहज मिसळून जाण्याची ताकद तिने दाखवून दिली आहे.
विद्या बालनची सध्या विनोदी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळतेय.
तिच्या इन्स्टाग्राम पेजवर नजर टाकली तर अनेक मजेशीर रील्स पाहायला मिळतात.
विद्याच्या या रिल्सना चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो.
पण सध्या तिने मराठीत केलेल्या रिलची जास्त चर्चा होतेय.
विद्याने ‘चला हवा येऊ द्या’ मधील डायलॉगवर एक धमाल रील केलं आहे.
विद्याचं हे मराठीतील रील सोशल मीडियावर सध्या चांगलच व्हायरल होत आहे.
विद्याने याआधी फक्त मराठीच नाही तर पंजाबी भाषेतसुद्धा व्हिडीओ केले आहेत.