JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / KBC11: पत्नीच्या हट्टामुळे हनी झाला 'करोडपती' धनी, आता बिग बींनी विचारला 7 कोटींचा प्रश्न

KBC11: पत्नीच्या हट्टामुळे हनी झाला 'करोडपती' धनी, आता बिग बींनी विचारला 7 कोटींचा प्रश्न

लोकप्रिय टीव्ही रिअ‍ॅलिटी शो ‘कौन बनेगा करोड़पति’ (KBC 11)सीझन 11 ला त्यांचा तिसरा करोडपतीदेखील मिळाला आहे. पण हा विजेता आता 7 कोटी देखील जिंकणार का? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 ऑक्टोबर : लोकप्रिय टीव्ही रिअ‍ॅलिटी शो ‘कौन बनेगा करोड़पति’ (KBC 11)सीझन 11 ला त्यांचा तिसरा करोडपतीदेखील मिळाला आहे. KBCच्या अकराव्या सीझनमध्ये सनोज राज आणि बबिता ताडे यांच्यानंतर आता बिहारचे गौतम झा यांनी 1 कोटी रुपये जिंकले आहेत. या शोमधील एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. एक कोटी रुपये जिंकल्यानंतर गौतम झा यांना बिग बी अमिताभ बच्चन तब्बल 7 कोटी रुपयांचा प्रश्न विचारण्याच्या तयारीत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. (वाचा :  आलिया भट्टला वहिनी करण्यावर करिना कपूरने दिलं भन्नाट उत्तर, करण जोहरने उडवली थट्टा ) पण गौतम यांनी 7 कोटी रुपये जिंकण्यासाठी त्या महत्त्वपूर्ण प्रश्नांसदर्भात नेमका कोणता निर्णय घेतला, हे शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओवरून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. कारण या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन गौतम यांना सतर्क करत असल्याचं दिसत आहे. 7 कोटी रुपयांचा प्रश्न गौतम यांच्यासमोर ठेवण्यापूर्वी बिग बी त्यांना सांगत आहेत की, ‘आता तुमच्याकडे कोणत्याही लाइफ लाइन पर्याय नाहीय’. त्यामुळे गौतम नेमका काय निर्णय घेणार आहेत, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना एपिसोड प्रक्षेपित होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

संबंधित बातम्या

(वाचा : ‘एक तो कम जिंदगानी’ गाण्याच्यावेळी नोरा फतेहीचा झाला अपघात, समोर आला VIDEO ) KBCच्या मंचावर 1 कोटी रुपये जिंकणारे गौतम कुमार झा यांनी IIT धनबाद येथून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. गौतम सध्या भारतीय रेल्वे सेवेत इंजिनिअर पदावर कार्यरत आहेत. दरम्यान,KBC शोनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रोमोद्वारे स्पष्टपणे दिसत आहे की गौतम यांना आयुष्यात मिळालेल्या यशात त्यांच्या पत्नीचा खूप मोठा वाटा आहे. (वाचा : लग्नापूर्वी दीपिका पदुकोणला अशा नजरेने पाहायचा रणवीर सिंग, शेअर केला PHOTOS ) सापांसोबत गरबा! हा व्हिडिओ पाहून तुम्हीही अचंबित व्हाल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या