JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अमिताभ बच्चन चाहत्यांना भेटण्यापूर्वी चप्पल का काढतात? कारण आलं समोर

अमिताभ बच्चन चाहत्यांना भेटण्यापूर्वी चप्पल का काढतात? कारण आलं समोर

अभिनेते अमिताभ बच्चन गेली अनेक दशके बॉलिवूडवर राज्य करत आहेत. गेल्या अनेक वर्षात अमिताभ बच्चन यांनी उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

जाहिरात

अमिताभ बच्चन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 नोव्हेंबर : अभिनेते अमिताभ बच्चन गेली अनेक दशके बॉलिवूड वर राज्य करत आहेत. गेल्या अनेक वर्षात अमिताभ बच्चन यांनी उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपट कोणताही असो, अमिताभ बच्चन आपल्या अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांना भुरळ पाडतात. देशाचे मोठे स्टार झाल्यानंतरही अमिताभ बच्चन यांच्या शैलीत नम्रता कायमच दिसून येते. गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांची गर्दी असते. रविवारी अमिताभ बच्चन घरातून बाहेर आले आणि त्यांनी शूज काढले. यानंतर बाहेर येऊन चाहत्यांना नमन केले. याविषयी अमिताभ यांनी ब्लॉगवर एक पोस्ट शेअर केली आहे. रविवारी अमिताभ बच्चन यांनी जलसा बाहेरील गर्दीला सलाम केला. इतकंच नाही तर अमिताभ बच्चन आतून बाहेर आले आणि आधी त्यांनी शूज काढले. यानंतर हात जोडून त्यांच्या चाहत्यांना नतमस्तक झाले. अमिताभ बच्चन यांच्या या स्टाइलने त्यांचे चाहतेही थक्क झाले. चाहत्यांप्रती असलेली त्यांची निष्ठा, भक्तीमुळे ते त्यांना भेटण्यापूर्वी चप्पल काढतात. घराबाहेरील चाहत्यांच्या गर्दीविषयी बच्चन लिहितात, बच्चन लिहितात, ‘माझ्या लक्षात आले आहे की लोकांची संख्या कमी झाली आहे आणि उत्साह कमी झाला आहे. आता आनंदाने ओरडणाऱ्या लोकांच्या आवाजाची जागा मोबाईलच्या कॅमेऱ्याने घेतली आहे. हे एक लक्षण आहे की काळ बदलला आहे. आणि काहीही कायमचं टिकत नसतं.’

संबंधित बातम्या

अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमामुळे सतत चर्चेत असतात. या कार्यक्रमाची धुरा महानायक अमिताभ बच्चन सांभाळताना दिसतात. केबीसीच्या मंचावर बिग बींनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. याशिवाय ते त्यांच्या ब्लॉगमधूनही काहीना काही शेअर करत असतात.

दरम्यान, 11 ऑक्टोबरला अमिताभ यांनी त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा केल्याची माहिती आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी KBC या शोमध्ये एक खास एपिसोड ठेवण्यात आला होता. या एपिसोडमध्ये अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन देखील दिसले होते. यावेळी अमिताभ खूप भावनिक झालेले पहायला मिळाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या