ऐश्वर्याच्या 'त्या' बोल्ड सीन्समुळे नाराज होते सासू-सासरे!

ऐश्वर्या रॉयने एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

आजही एवढ्या वर्षानंतर तिची जादू कायम आहे.

अभिषेक बच्चनसोबत लग्नानंतर चित्रपटसृष्टीपासून काहीशी दूर होती.

आई झाल्यानंतर ऐश्वर्याने 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटातून कमबॅक केले होते. पण तेव्हा तिला सासरच्यांची  नाराजी झेलावी लागली होती.

याचं कारण म्हणजे ऐश्वर्यापेक्षा वयाने लहान असलेल्या रणबीर कपूरसोबतचे तिचे बोल्ड सीन्स.

'ए दिल है मुश्किल' सिनेमातील ऐश्वर्या आणि रणबीरच्या हॉट केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

पण हे सीन्स पाहून तिच्या सासरची मंडळी भलतीच नाराज झाली होती.

या चित्रपटात एका सीनमध्ये त्या दोघांचे लिप लॉक देखील होते.

असं म्हणतात कि, अमिताभ बच्चन यांनी आक्षेप घेतल्यानंतरच त्यांचे अनेक सीन्स चित्रपटातून कापण्यात आले होते.

चित्रपटातील ऐश्वर्याची स्टाईल पाहून तिचे सासरे रागावले होते आणि त्यांनी स्वतः ही नाराजी ऐश्वर्यासमोरही व्यक्त केली होती.