मुंबई, 5 सप्टेंबर: मार्च 2022 मध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपट रिलीज झाला तेव्हा, सर्वांकडून मिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या. मात्र त्यानंतरही, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर (Blockbuster) ठरला. या चित्रपटाने 300 कोटी रुपयांचा कमाईचा टप्पा ओलांडला आणि कोरोना महामारीनंतर (Corona Epidemic) अशी कामगिरी करणारा तो पहिलाच हिंदी चित्रपट ठरला. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी (Pallavi Joshi) आणि दर्शन कुमार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. काही प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं, तर काहींना तो आवडला नाही. मात्र, या चित्रपटात महत्त्वाची भूमिका (Important Role) साकारणाऱ्या अभिनेत्री पल्लवी जोशीने बॉलिवूड चित्रपट सध्या का अपयशी होत आहेत, यावर भाष्य केलंय. हिंदुस्तान टाइम्ससोबत बोलताना पल्लवी जोशीने बॉलिवूड कुठे चुकतंय याचा खुलासा केला. ती म्हणते, ‘मी बॉलिवूडची तज्ज्ञ नाही, त्यामुळे ‘शमशेरा’ , ‘दोबारा’ किंवा इतर चित्रपटांमध्ये काय चूक झाली, हे मला माहीत नाही. पण आमचा चित्रपट यशस्वी होण्यामागे नेमकं काय कारण होतं, ते मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते,’ असे सांगतानाच पल्लवी म्हणाली, ‘एखादा चित्रपट कुठल्या भावनेतून सादर केला जातोय याची जाणीव प्रेक्षकांना असते, माझा असा विश्वास आहे. रंगभूमीवर काम करत असताना मी जी भूमिका करत होते त्यात माझंच लक्ष लागत नव्हतं, त्यामुळे मला प्रेक्षकांकडून तसा प्रतिसादही मिळायचा नाही. हेच चित्रपटांनाही लागू आहे. रुपेरी पडद्याच्या माध्यमातूनही प्रेक्षक तुम्ही किती प्रामाणिकपणे कलाकृती सादर करत आहात हे जाणून घेतातच.’ हेही वाचा - एकेकाळी केक घेण्यासाठीही नव्हते पैसे, आज करोडोंचे मालक आहेत Pankaj Tripathi, इतकी आहे संपत्ती पल्लवीच्या म्हणण्यानुसार, तिला वाटतं की, ‘द काश्मीर फाइल्स लोकांना आवडण्याचं कारण म्हणजे या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या समस्या या देशातील लोकांना पहायच्या होत्या. अशा समस्या दाखवण्यास बहुतेक चित्रपट घाबरत आहेत. पण कलाकार म्हणून समाजाला आरसा दाखवण्याचं काम करावं लागतं. भलेही तुम्ही सत्तेच्या विरोधी असाल. राज कपूर, सुनील दत्त, मनोज कुमार यांच्या चित्रपटांचा विचार केला, तर त्यांनी समाजात जे काही चाललं आहे, ते दाखवलं होतं.’ ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यावधीची कमाई केली. कोरोना महामारीनंतर सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या खूप कमी झाली होती. मात्र, ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी ठरला. आता याच चित्रपटातील अभिनेत्री पल्लवी जोशी हिने बॉलिवूड चित्रपटाच्या यश-अपयशावर भाष्य केलं आहे.